मुंबई 19 जून: बॉलिवूडमध्ये रुसवे-फुगवे होणं हा नवा प्रकार नाही. कधी रिलेशनशिप तुटण्यापासून अगदी को-ऍक्टरमध्ये भांडणं होईपर्यंत अनेक किस्से होत आले आहेत. असाच एक ब्रेकअपचा किस्सा सध्या बराच चर्चेत आहे तो म्हणजे करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रॉडक्शन (Dharma Production) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांचा. भुलभुल्लैया 2 फेम स्टारचं धर्मा प्रॉडक्शनसोबत काहीतरी बिनसलं असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कार्तिक आणि करण (Karan Johar and Kartik Aaryan together) यांचे प्रोफेशनल संबंध बिघडल्याचं सांगितलं जात आहे. अशातच कार्तिक आणि करण एकाच मंचावर समोरासमोर आल्याचं दिसून आलं. नुकत्याच झालेल्या पिंकविला स्टाईल आयकॉन पुरस्कार सोहळ्यात ही जोडी समोरासमोर आली. त्यांच्यातलं वातावरण फार काही बरं नाही हे आता सगळ्यांच्या लक्षात येत आहे. या कार्यक्रमाला अनेक स्टार मंडीळीनी हजेरी लावली होती. काही जुनी नाती सुद्धा या सोहळ्यात एकमेकांसोबत दिसली. वरुण धवनने या संधीचं सोनं करून या दोघांना स्टेजवर एकत्र नाचायला भाग पाडलं असं सांगितलं जात आहे. ‘जुग जुग जियो’ या नव्या चित्रपटातील नाच पंजाबन गाण्यावर ताल धरत रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, आयुष्मान खुराना, वरुण धवन, किआरा अडवानी, अर्जुन कपूर असे अनेक स्टार्स एकत्र ठुमके लावताना दिसले. यात (Varun Dhawan) वरुणने कार्तिककडे जाऊन “कम ऑन, तू धर्माच्या गाण्यावर नाचू शकतेस” असं म्हणत त्याला स्टेजवर यायची विनंती केली. अखेर कार्तिक हसतहसत स्टेजवर तर आला पण त्याने गाण्यावर नृत्य केलं नाही अशी माहिती मिळत आहे. कार्तिक स्टेजवर आल्यावर वरुण करण जोहरला सुद्धा स्टेजवर घेऊन आला आणि अशा पद्धतीने दोघेही स्टेजवर एकत्र आल्याचं सांगितलं जातं. काहींच्या मते वरुणने कार्तिकला मुद्दाम चिडवलं आणि त्याला मुद्दाम स्टेजवर आणलं तर काहींनी कार्तिकने नृत्य न केल्याबद्दल त्याचं कौतुकसुद्धा केलं आहे. वरुणने यासंबंधी एक विडिओ पोस्ट करत त्यात खास अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) मेन्शन करत सांगितलं की अर्जुन त्यांच्यासोबत नाचला नाही. त्यावर अर्जुनने एक स्टोरी टाकत त्याला उत्तर दिल होतं. तो म्हणाला होता ‘मी नाचत होतो तेव्हा कोणीच रेकॉर्ड केलं नाही कारण तुमचं लक्ष कार्तिककडे होतं. त्याच्या भुलभुलैय्यामध्ये तुम्ही हरवला होतात.”
दोस्ताना 2 चित्रपटातून कार्तिकची हाकालपट्टी झाल्यावर कार्तिकने धर्मा प्रॉडक्शन सोडल्याची चर्चा सुद्धा सुरु आहे. यावर कार्तिकने मौन सोडत ही एक अफवा आहे असं सुद्धा म्हणलं होतं. पण या नव्या प्रसंगामुळे त्यांचं भांडण मिटलं आहे का? अशी एक वेगळी चर्चा सुद्धा सुरु झाली आहे. कार्तिकने काही सीन्स शूट करून दोस्ताना चित्रपट सोडल्याचं सांगितलं जात आहे. तेव्हापासूनच करण आणि कार्तिक यांच्यात संबंध ठीक नसल्याचं समोर येत आहे. **हे ही वाचा-** Koffee With Karan मध्ये बॉलिवूडच नव्हे तर साऊथ स्टार्ससुद्धा होणार सहभागी? यादिवशी सुरु होणार शो कार्तिकने या सोहळ्यात अनेक awkward moments चा सामना केला. त्याच्या कथित गर्लफ्रेंड सारा अली खानसोबत त्याच ब्रेकअप झाल्याचं सुद्धा समोर आलं होतं. या सोहळ्यात मिडीयानी दोघांना एकत्र pose द्यायला सांगितल्यावर तो बराच awkward झालेला दिसला. तसंच वरुणने केलेल्या या अचानक विधानाने सुद्धा तो पटकन गांगरून गेल्याचं समोर येत आहे.