मुंबई, 19 जून- ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan-7) हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शोपैकी एक आहे. गेल्या काही सीजनपासून हा शो डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रक्षेपित केला जात आहे. या शोमध्ये बी-टाऊनमधील (Bollywood Celebrity) जवळजवळ सर्व सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. हे सेलिब्रेटी आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना हा शो पाहायला प्रचंड रस वाटतो. आता पुन्हा एकदा करण जोहर (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ च्या सातव्या सीजनसह भेटीला येत आहे. नुकतंच त्याने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे. करण जोहर सोशल मीडियावर सतत आपल्या प्रोजेक्ट्स आणि पर्सनल लाईफसंबंधी अपडेट्स देत असतो. आजही अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर करत आपण ‘कॉफी विथ करण’ चा सातवा सीजन घेऊन येत असल्याचं सांगितलं आहे. करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण-7’ लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे.येत्या ७ जुलैला या शोचा पहिला भाग प्रक्षेपित केला जाणार आहे.
करण जोहरच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते जाम खुश आहेत. या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत चाहते आणि सेलिब्रेटी करणला शुभेच्छा देत आहेत.शिवाय हा शो पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं ते सांगत आहेत. या शोच्या पहिल्या भागात कोणते कलाकार येणार? किंवा शोमध्ये कोणते कलाकार पाहायला मिळणार? यासाठी चाहते उत्सुक आहेत. **(हे वाचा:** Kajal Aggarwal B’day: साऊथमध्ये हिट,बॉलिवूडमध्ये फ्लॉप; तरीही इतक्या कोटींची मालकीण आहे काजल अग्रवाल ) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या शोमध्ये सहभागी होणाऱ्या गेस्टबाबत अनेक होत्या. काही रिपोर्ट्सनुसार, या शोमध्ये कतरिना-विकी, आलिया-रणबीर, मलायका-अर्जुन अशा अनेक सेलिब्रेटी जोड्या सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर काही रिपोर्ट्समध्ये या शोमध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदना, समंथा प्रभू, रामचरण,ज्यु. एनटीआर हे साऊथ कलाकार सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता या शोमध्ये कोणकोणते कलाकार हजेरी लावणार हे शो सुरु झाल्यांनतरच समजेल.