मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘थप्पड’ला फ्लॉप म्हटल्यावर दिग्दर्शक अनुभव सिन्हांचा राग अनावर, ट्विटरवर दिल्या शिव्या

‘थप्पड’ला फ्लॉप म्हटल्यावर दिग्दर्शक अनुभव सिन्हांचा राग अनावर, ट्विटरवर दिल्या शिव्या

थप्पडबाबत येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रिया वाचून दिग्दर्शक अनुभव सिन्हा चकित झाले असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. मात्र सोशल मीडियावर व्यक्त होताना या दिग्दर्शकाने शिव्या दिल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 08 मार्च : तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असणारा 'थप्पड' (Thappad) हा सिनेमा 28 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला.  समीक्षकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिल्यावर लोकं या सिनेमाला फ्लॉप फिल्म म्हणत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया वाचून चकित झाले असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. मात्र सोशल मीडियावर व्यक्त होताना या दिग्दर्शकाने शिव्या दिल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

(हे वाचा-'विवाहित स्त्रिया सुखी नाहीत तर...' महिला दिनानिमित्त मलायकाची पोस्ट VIRAL)

'आर्टिकल 15 (Article 15)', मुल्क (Mulk) तसंच ‘तुम बिन' सारख्या उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर अनुभव सिन्हा यांना ‘थप्पड'कडून खूप अपेक्षा होती. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला होता. पण बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने फारशी कमाल केली नाही. यावर चित्रपटाविषयी एका प्रकाशनाने लिहिलं आहे की 'प्रेक्षकांनी थप्पडलाच मारली थप्पड'. दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांना ही टिप्पणी आवडली नाही. त्यांनी ही पोस्ट रिट्वीट करत त्यांची नाराजी व्यक्त केली.

त्यावेळी चित्रपटावर केलेली टीका दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या नजरेस पडली आणि त्यांना आपला राग अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी सोशल मीडियावर काही शिव्या लिहिलेली पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांचा रोष ओढावून घेतला.

सुधीर मिश्रा यांचे ट्वीट रीट्वीट करत अनुभव सिन्हा यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. ते म्हणाले या चित्रपटात माझे पैसे गुंतले आहेत, त्यामुळे दुसऱ्यांना याबाबत काय समस्या आहे असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यांच्या फॅन्सनी त्यांच्या मुद्द्याला जरी पाठिंबा दिला असला तरी शिव्यांचा वापर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Tapasi pannu