लॉस एंजलिस, 09 मार्च : कोरोना व्हायरस चीनबरोबरच अमेरिका, इटली, इराण आणि इतर 60 देशांमध्ये रौद्ररुप धारण करत आहे. त्याचप्रमाणे भारतातही कोरोनाने पाळंमुळं रोवायला सुरूवात केली आहे. Covid-19 मुळे अनेक सामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. सेलिब्रिटीही यापासून वाचले नाही आहेत. पॉप सिंगर केटी पेरी (Katy Perry) आणि अभिनेता ओरलांडो ब्लूम (Orlando Bloom) यानी त्यांचं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. Coronavirus मुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान ‘पीपल’च्या अहवालानुसार केटी गरोदर आहे आणि या कपलने जूनमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्या त्यांनी आपलं लग्न पुढे ढकललं असल्याची माहिती मिळते आहे.
(हे वाचा-‘थप्पड’ला फ्लॉप म्हटल्यावर अनुभव सिन्हांचा राग अनावर, ट्विटरवर दिल्या शिव्या)
या सेलिब्रिटी कपलच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जपानमध्ये 150 लोकांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न होणार होतं. त्यासाठी तयारी देखील पूर्ण झाली होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे त्यांना लग्नाचा निर्णय पुढे ढकलावा लागत आहे. पेरीने स्वत: ही घोषणा केली होती की ती तिच्या आणि ब्लूमच्या लग्नाची तयारी करत आहे. गायिकेने ‘नेव्हर वोर्न व्हाईट’ या व्हिडीओच्या माध्यमातून ही घोषणा केली होती.
हॉलिवुडच नाही तर बॉलिवुडमध्ये कोरोनोमुळे तणावाचं वातावरण आहे. अनेक चित्रपटांचं शुटिंग थांबवण्यात आलं आहे.
(हे वाचा- 'विवाहित स्त्रिया सुखी नाहीत तर...' महिला दिनानिमित्त मलायकाची पोस्ट VIRAL)
सलमान खान (Salman Khan) ची अपकमिंग फिल्म 'राधे: युअर मोस्ट वाँटेड भाई' (Radhe: Your Most Wanted Bhai), अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'पृथ्वीराज' (Prithviraj) आणि आता करण जोहर (Karan Johar) ची अपकमिंग फिल्म 'तख्त' (Takht) ची शूटिंग थांबवण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या पृथ्वीराजचं शूटिंग राजस्थानमधून मुंबईत हलवण्यात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus, Coronavirus