मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kareena Kapoor: 'लाल सिंह चड्ढा'च्या प्रमोशनसाठी पतौडी बेगमचा ट्रेडिशनल लुक, करीनावर चाहते फिदा

Kareena Kapoor: 'लाल सिंह चड्ढा'च्या प्रमोशनसाठी पतौडी बेगमचा ट्रेडिशनल लुक, करीनावर चाहते फिदा

 लाल सिंह चड्ढाच्या प्रमोशनसाठी फिरोजी दुपट्टा, डिझाइनर सूटमध्ये करीनाचा ट्रेडिशनल लुक समोर आलाय. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

लाल सिंह चड्ढाच्या प्रमोशनसाठी फिरोजी दुपट्टा, डिझाइनर सूटमध्ये करीनाचा ट्रेडिशनल लुक समोर आलाय. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

लाल सिंह चड्ढाच्या प्रमोशनसाठी फिरोजी दुपट्टा, डिझाइनर सूटमध्ये करीनाचा ट्रेडिशनल लुक समोर आलाय. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

  मुंबई, 08 ऑगस्ट: बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर. लग्न झाल्यानंतर करीना मात्र पतौडी घराण्याची सून झाली आहे. करीना लग्न झाल्यानंतर 2 मुलांची आई  झाली त्यामुळे सीनेसृष्टीपासून काहीशी दूर असल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या ब्रेकनंतर करीनाचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ज्याच नाव आहे लाल सिंह चड्ढा.  सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात करीना आमिर खानबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी काही दिवस उरले असताना कलाकार सिनेमाचं दणकून प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान प्रमोशनसाठी करीनाचा ट्रेडिशनल लुक समोर आला आहे. बऱ्याच दिवसांनी करीनाला पंजाबी ड्रेसमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. सिनेमाच्या रिलीजआधी करीनानं शानदार फोटोशूट केलं आहे. निळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये करीनानं अफलातून फोटोशूट केलं आहे. निळ्या रंगाचा ड्रेस वर त्यावर डिझाइनर सेम कलरच्या दुपट्ट्यानं करीनाच्या आऊटफिटला चार चांद लावले आहेत. ट्रेडिशनल लुकमध्ये पतौडी बेगमचं सौंदर्य चांगलंच खुलून आलं आहे. मध्यंतरी आलिया रणबीरच्या लग्नात करीना ट्रेडिशनल लुकमध्ये दिसली होती. मात्र पंजाबी ड्रेस तिनं गेली कित्येक वर्षात घातला नसेल. तिचा पंजाबी ड्रेसमधील लुक पाहून चाहत्यांना तिच्या जब वी मेट सिनेमाची आठवण झाली आहे. हेही वाचा - Rakshabandhan 2022 : रुबिना दिलैकपासून ते करीना कपूरपर्यंत 'या' बॉलिवूड अभिनेत्री बहिणींसोबत करतात राखी साजरी अभिनेत्री करीना कपूर वयाच्या 41 व्या वर्षी तैमूर आणि जेह या दोन मुलांची आई आहे. मात्र व्यायाम आणि योगाच्या जोरावर करीनानं तिचा फिटनेस आणि ग्लो कायम राखला आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींपैकी करीना एक आहे. तिचा फिटनेस आणि सौंदर्य बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा चर्चेचा विषय असतो. करीनानं आता केलेलं निळ्या ड्रेसमधील फोटोशूट हे मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमधील आहे.
  मधल्या काळात करीना प्रेग्नंसीमुळे वाढलेल्या वजनामुळे प्रचंड ट्रोल झाली होती. मात्र ट्रोलर्सच्या ट्रोलिंगला न जुमानता न बोलता करीना पुन्हा एकदा तिच्या जुन्या लुकमध्ये आली. करीनाची ही जर्नी अनेक अभिनेत्रींसाठी प्रेरणादायी ठरली. अनेक वर्षांनी करीना लाल सिंह चड्ढा सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या शुटींगवेळी करीना दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती. जेह तिच्या पोटात होता. त्यामुळे जेह देखील लाल सिंह चड्ढा सिनेमाचा एक भाग आहे असं करीनानं एका मुलाखतीत म्हटलं होतं. लाल सिंह चड्ढा हा सिनेमा गेली अनेक दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमाला किती प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News

  पुढील बातम्या