रक्षाबंधन म्हणजेच राखीचा पवित्र सण, बहिणी भावाला राखी बांधण्यासाठी संपूर्ण वर्षभर वाट पाहत असतात. मात्र अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्या आपल्या बहिणींना राखी बांधण्यासाठी वाट पाहतात. या अभिनेत्रींचे आपल्या बहिणीसोबत खास बॉन्डिंग आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा यांचं नाव पहिलं येतं. दोघींमध्ये एक स्पेशन बॉन्ड आहे. राखीच्या निमित्ताने दोघेही एकमेकांना राखी बांधतात. याशिवाय चुलत भावांनाही त्या राखी बांधतात.
अभिनेत्री रुबिना दिलैकचं देखील तिची बहिण ज्योतिकासोबत चांगलं बॉन्डिंग आहे. दोघींमधलं बॉन्डिंग बिग बॉसच्या घरातही अनेकांनी पाहिलं आहे. जेव्हा ज्योतिका तिची बहिण रुबिनाला सपोर्ट करण्यासाठी येते.
अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिची बहीण निशा अग्रवाल दरवर्षी एकत्र राखी सण साजरा करतात. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात.
अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तिची बहिण समिक्षा पेडणेकर यांचेही संबंध खूप खास आहेत. वडिल गेल्यानंतर त्यांनी एकमेकींची चांगली साथ निभावली. दोघेही दिसायला काहीशा सारख्याच आहेत. त्यामुळे अचानक समोर आल्यावर दोघींना ओळखणं थोडं कठिण जाईल.
अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि नुपूर सेनन यांनीही एकमेकांना राखी बांधून राखीचा सण साजरा केला. दोघींमधलं नातं खूप घट्ट असल्याचं आपल्याला त्यांच्या फोटो आणि व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमधून दिसत असतं.
मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांच्यातील बॉंन्डिंग विशेष आहे. दरवर्षी राखीच्या निमित्ताने दोघेही एकमेकांना राखी बांधतात. दोघेही खूप बोल्ड आणि बनधास्त स्वभावाच्या आहेत.
शगुन पन्नू ही तापसीची हुबेहूब कॉपी दिसते. 2006 मध्ये 'मिस इंडिया'ची फायनलिस्ट असलेली शगुन पन्नू सध्या एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते ज्यामध्ये तिची बहीण तापसी देखील भागीदार आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची बहीण अनिशा पदुकोण दरवर्षी एकत्र राखीचा सण साजरा करतात. दोघींचंही एकमेकींशी चांगलं पटतं. अनेकवेळा त्यांचे फोटो समोर येत असतात.