जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kareena kapoor khan : 'तू इतकंही वाईट खेळत नाहीस' म्हणत करिनाने सैफला दिली कॉप्लिमेंट; चाहते म्हणाले 'कपल गोल्स'

Kareena kapoor khan : 'तू इतकंही वाईट खेळत नाहीस' म्हणत करिनाने सैफला दिली कॉप्लिमेंट; चाहते म्हणाले 'कपल गोल्स'

kareena kapoor and saif ali khan

kareena kapoor and saif ali khan

करीना कपूर आणि सैफ अली खान हे जोडपं काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतं. पण सध्या करीनाने सोशल मिडीयावर शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमुळे हे दोघे पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 ऑगस्ट : सोमवारची सकाळ म्हटलं की ती कंटाळवाणी असते असं चित्र आपल्या समोर येतं. पण बॉलिवूडची बेबो करीना कपूर मात्र याला अपवाद ठरली आहे. सोमवारच्या सकाळी ती खूपच उत्साही दिसून आली. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान हे जोडपं काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतं. कधी त्यांच्या वक्तव्यावरून चर्चा होते तर कधी त्यांच्या चिमुकल्यांनी चर्चा होते. पण हे जोडपे सध्या चर्चेत आलंय ते नव्या व्हिडीओवरून. करीना कपूर, पती सैफ अली खान आणि त्यांची मुले जेह आणि तैमूरसह वीकेंडला मुंबईबाहेर गेली होती. पण ती नेमकी कुठे गेली हे मात्र गुलदस्त्यात होतं. मात्र अभिनेत्रीने स्वतःच सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत तिचं लोकेशन सांगितलं. आणि त्याच्या पाठोपाठ एक व्हिडिओदेखील पोस्ट केला. सध्या सैफ अली खानच्या कुटुंबाचा मुक्काम सध्या  लखनौच्या पतौडी पॅलेसमध्ये आहे. सोमवारी सकाळी करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लोकेशनचा फोटो शेअर केला. नंतर तिने तिचा आणि सैफचा पॅलेसमध्ये बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. तिने या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरील व्हायरल म्युझिक ट्रॅक जोडला आणि त्या पोस्टला कॅप्शन दिले: “नवऱ्यासोबत सोमवारी सकाळी बॅडमिंटन खेळतीये…’ असं म्हणत तिने सैफचे फिरकी घेत लिहिलं कि, ‘तू इतकंही वाईट खेळत नाहीस’.

जाहिरात

तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी ‘कपल गोल्स’ म्हणत कमेंट केल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना देखील उत्साही वाटले असणार हे नक्की. सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी  2012 मध्ये लग्न केले. या दोघांना तैमूर आणि जहांगीर नावाची दोन मुलं आहेत. तिच्या या दोन मुलांची कायम चर्चा असते. हेही वाचा - Family man actress : ब्रालेस जॅकेट अन् ब्लॅक बॉटम; फॅमिली मॅन फेम ‘ही’ अभिनेत्री देतेय उर्फीला टक्कर या दोघांच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं झालं तर सैफचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘विक्रम वेधा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये  तो ऋतिक रोशनसह झळकणार आहे. तसेच प्रभास आणि क्रिती सॅननसह आदिपुरुष या चित्रपटातदेखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर करीना कपूर खान नुकतीच बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकली होती. येणाऱ्या काळात ती विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्यासह  ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ मध्ये दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात