सैफच्या अगोदर 'या' मिस्टर खानवर जडला होता करीनाचा जीव

सैफच्या अगोदर 'या' मिस्टर खानवर जडला होता करीनाचा जीव

सैफच्या अगोदर करीना आणि शाहिदचं अफेअर खूप गाजलं होतं. मात्र त्याआधी आणखी एका मिस्टर खानवर करीनाचा जीव जडला होता.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूड अशी सेलिब्रेटी आहे जी आपल्या खासगी जीवनाबद्दल कधीच काही लपवून ठेवत नाही. अफेअरपासून ते प्रेग्नन्सी पर्यंत सर्वच गोष्टी करीनानं सर्वासमोर मिरवल्या. आज करीना 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊयात करीनाच्या आयुष्यांती काही रंजक गोष्टी ज्या अद्याप कोणालाच माहित नाही. करीना आणि शाहिद कपूरच्या अफेअर पासून ते सैफ अली खानसोबत लग्नापर्यंत सर्वच गोष्टी तिच्या आयुष्यातलं प्रत्येक सत्य नेहमीच समोर आलं. मात्र काही गोष्टी अद्याप अशा आहेत जे फार कमी लोकांना माहित आहेत.

नवाब सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी करीना शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती हे तर सर्वांनाच माहित आहे. मात्र याशिवाय इतर काही अभिनेत्यांशीही तिचं नाव जोडलं गेलं होतं. सैफशी लग्न करण्यापूर्वी करीनाच्या आयुष्यात आणखी एक मिस्टर खान येऊन गेला आहे. याशिवाय काही काळासाठी करीना ऋतिक रोशनला डेट करत होती.

दीपवीरच्या IIFA लुकवर नेटकरी सैराट, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

कभी खुशी कभी गमच्या शूटिंग दरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. 2001 मध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चा कानावर आल्या होत्या. या दोघांनी 'मुझसे दोस्ती करोगे', 'मैं प्रेम की दीवानी हूं' यासारख्या सिनेमात एकत्र काम केलं आहे. त्यानंतर हे दोघंही लग्न करणार असल्याचंही बोललं गेलं होतं.

VIRAL VIDEO : IIFA अवॉर्ड फंक्शनमध्ये सलमान खानच्या मागे लागला कुत्रा

करीना कपूर ज्या नात्याबद्दल जास्त पझेसिव्ह होती ते नातं होतं शाहिद कपूरसोबतचं. या दोघांची पहिली ओळख 2004 मध्ये 'फिदा' सिनेमाच्या सेटवर झाली होती. शाहिदच्या प्रेमात ती व्हेजिटेरियन झाली. मात्र नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि करीनाचं सुत सैफशी जुळलं. त्यानंतर शाहिद आणि करीना यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं.

मात्र फार कमी लोकांना माहित आहे की शाहिदच्या आधी करीनाचं फरदीन खानसोबत सीक्रेट अफेअर होतं. मात्र या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच करीना आणि शाहिदचं नातं समोर आलं आणि फरदीन खानचं नाव मागे पडलं.

अखेर तिचं आणि शाहिदचं नातं संपलं आणि बेबोचा जीव सैफवर जडला. तीन वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न केलं. यश चोप्राच्या टशन सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर अनेक ठिकाणी हे दोघं एकत्र दिसले. 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं.

जयललितांच्या बायोपिकसाठी कंगनानं कसली कंबर, 'असा' केला मेकओव्हर

=======================================================

VIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 11:17 AM IST

ताज्या बातम्या