जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दीपवीरच्या IIFA लुकवर नेटकरी सैराट, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

दीपवीरच्या IIFA लुकवर नेटकरी सैराट, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

दीपवीरच्या IIFA लुकवर नेटकरी सैराट, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

सोशल मीडियावर या दोघांच्या ड्रेसची खिल्ली उडवली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 20 सप्टेंबर : आयफा (IIFA Awards 2019) नेहमीच कलाकरांच्या स्टायलिश अंदाज आणि लुक्ससाठी चर्चेत राहिला. ग्रीन कार्पेटवर आपण इतरांपेक्षा सुंदर आणि वेगळ दिसावं असा या अवॉर्ड फंक्शनला पोहोचणाऱ्या प्रत्येकचा प्रयत्न असतो. दरवर्षी भारताबाहेर होणारा हा अवॉर्ड सोहळा यंदा मुंबईमध्येच पार पडला. आयफानं यंदा 20 वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी सुद्धा आयाफा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली. मात्र यावेळी या दोघांच्या लुकवर सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या लुकच्या मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. आयफा अवॉर्ड फंक्शनसाठी दीपिकानं पर्पल कलरचा ऑफ शोल्डर आणि लांब ट्रेल असलेला ड्रेस घातला होता. रणवीर मात्र नेहमी प्रमाणे अत्रंगी लुकमध्ये दिसला. त्यानं ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन असलेला सुट घातला होता. या ड्रेसवर त्यानं लाल रंगाचा कपडा सुद्धा दुपट्ट्यासारखा घेतला होता. सोशल मीडियावर या दोघांच्या ड्रेसची खिल्ली उडवली जात आहे. एका युजरनं दीपिकाच्या ड्रेसची तुलना लादी पुसण्याच्या मॉपसोबत केली आहे. जयललितांच्या बायोपिकसाठी कंगनानं कसली कंबर, ‘असा’ केला मेकओव्हर

    जाहिरात

    तर एका युजरनं एका कार्टुन कॅरॅक्टरचा फोटो शेअर करत हे दोघंही एकसारखे दिसत असल्याचं म्हटलं आहे.

    रणवीर सिंहच्या ड्रेसची तुलना भुलभुलैय्या सिनेमातील राजपाल यादवच्या भूमिकेशी करण्यात आली आहे.

    जाहिरात

    आणखी एका युजरनं रणवीरचा फोटो एका दोन पोनीटेल बांधलेल्या मुलीच्या फोटोशी करत पुढच्या वेळी दोन पोनीटेल असं म्हटलं आहे.

    जाहिरात

    आयफाच्या ग्रीन कार्पेटवर दीपिका पदुकोन पासून ते आलिया भट पर्यंत सर्वांच त्यांच्या युनिक लुक्स आणि ड्रेसमुळे चर्चेत राहिले. एकीकडे माधुरी दीक्षितच्या रेड गाऊननं सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या तर दुसरीकडे कतरिना कैफ सुद्धच्या मरुन गाऊननं सर्वांची मनं जिंकली. तर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या विचित्र ड्रेसनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्याच्या ड्रेसवरून सध्या सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. The Zoya Factor: क्रिकेट, प्रेम आणि अंधश्रद्धा, अशी आहे सोनम-दुलकरची केमिस्ट्री ================================================================== VIDEO : ‘सगळे सण एकत्र आले’, खिचडीवाल्या ‘करोडपती’ बबिता ताडेंशी खास बातचीत

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात