मुंबई, 20 सप्टेंबर : सध्या बाॅलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे. एकापाठोपाठ बायोपिक येतायत आणि हिटही होत आहेत. अलिकडेच ठाकरे आणि राणी लक्ष्मीबाई सारखे बायोपिक रिलीज झाले आणि ते चाललेही. आता राजकारणातल्या आणखी एका दिग्गज नेत्यावर सिनेमा येतोय. त्या आहेत जयललिता. जयललितांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका कंगना रणौत सकारत आहे. मणिकर्णिकामधील राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेनंतर कंगना आता दुसरी आव्हानात्मक भूमिका साकारायला सज्ज झाली आहे. या सिनेमासाठी कंगनानं पूर्ण मेकओव्हर केला आहे. या सिनेमासाठी कंगनाला prosthesis मेकअप करावा लागणार आहे आणि यासाठी कंगनानं लॉस एंजेलिस गाठलं आहे. कंगनाच्या टीमनं तिच्या या मेकओव्हरचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. ज्यात ती तिच्या चेहऱ्यावर हिरव्या निळ्या रंगाचा काहीतरी पदार्थ लावलेला दिसत आहे. याच्यामागे कंगनाचा चेहरा आहे हे ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘थलायवी’साठी जेसन कॉलिन्सच्या स्टुडिओ लॉस एंजेलिसमध्ये कंगना रणौत prosthesis मेकअप करत आहे. कॉलिन्सनं यापूर्वी कॅप्टन मार्व्हलसाठी काम केलं आहे. यात अजिबात शंका नाही की जयललिता यांचा बायोपिक नवा इतिहास घडवेल.’ बायोपिकसाठी कंगनाचे कष्ट पाहून तिचे चाहतेही अवाक झाले आहेत तुला यातून श्वास घेता येतोय का असं अनेकांनी तिला विचारलं आहे. The Zoya Factor: क्रिकेट, प्रेम आणि अंधश्रद्धा, अशी आहे सोनम-दुलकरची केमिस्ट्री
जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक तेलगू आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाने हा सिनेमा तिनं का स्वीकारला याचा खुलासा केला. ती म्हणाली, ‘ज्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल अशा चित्रपटात मला कायम काम करायचं होतं. या क्षेत्रात पदार्पण केल्यापासून माझ्या डोक्यात सतत हाच विचार होता. त्यानंतर तमिळनाडू आंध्रप्रदेश या ठिकाणी फिरताना इथल्या लोकांना थेट मनाला भिडणारे सिनेमे जास्त आवडतात ही गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली. अशातच माझ्याकडे जयललितांच्या बायोपिकची ऑफर आली आणि मी ती स्वीकारली.’ करोडपती होण्यासाठी हॉट सीटवर बसण्याची गरज नाही, घरबसल्या ‘असे’ जिंका 7 कोटी कंगना पुढे सांगते, ‘‘जयललितांची कथा वाचताना मला जाणवलं की त्यांच्या आणि माझ्या आयुष्यात बरचं साम्य आहे. त्यामुळे ही कथा मनाला भावली. अगोदर मी माझ्या जीवनावर आधारित बायपिकची निर्मिती करण्याच्या तयारीत होते मात्र जयललितांच्या बायोपिकची ऑफर आल्यावर मी त्याचा नीट अभ्यास केला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जयललिता आणि माझ्या जीवनात अनेक गोष्टी समान आहेत. अगदी थोड्या काळासाठी माझ्या आयुष्यात जसं नैराश्य आलं तसं त्यांच्याही आलं होतं. आमच्या दोघींच्या आयुष्यात असलेलं अनेक गोष्टीतील साम्य पाहिल्यावर मी हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.’’ रानू मंडलचं ‘हे’ गाणं ऐकून तुम्ही लता मंगेशकर यांचं ओरिजनल गाणंही विसराल!
दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय हे जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमातून जयललिता यांच्या जीवनातील चढउतार, त्यांची राजकीय कारकिर्द या सर्व गोष्टीचा उलगडा करण्यात येणार आहे. जयललिता यांचा बायोपिक हिंदी, तामिळ या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदीत ‘जया’ तर तेलुगुमध्ये ‘थलावयी’ असं या बायोपिकचं नाव असणार आहे. ================================================================ VIDEO : ‘सगळे सण एकत्र आले’, खिचडीवाल्या ‘करोडपती’ बबिता ताडेंशी खास बातचीत