VIRAL VIDEO : IIFA अवॉर्ड फंक्शनमध्ये सलमान खानच्या मागे लागला कुत्रा

VIRAL VIDEO : IIFA अवॉर्ड फंक्शनमध्ये सलमान खानच्या मागे लागला कुत्रा

IIFA अवॉर्ड सोहळ्यातील सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : आयफा (IIFA Awards 2019) नेहमीच कलाकरांच्या स्टायलिश अंदाज आणि लुक्ससाठी चर्चेत राहिला. ग्रीन कार्पेटवर आपण इतरांपेक्षा सुंदर आणि वेगळ दिसावं असा या अवॉर्ड फंक्शनला पोहोचणाऱ्या प्रत्येकचा प्रयत्न असतो. दरवर्षी भारताबाहेर होणारा हा अवॉर्ड सोहळा यंदा मुंबईमध्येच पार पडला. आयफानं यंदा 20 वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या ठिकाणी अनेक गंमतीशीर घटना घडल्या. ज्यात सलमान खानसोबत घडलेल्या या किस्सा मात्र सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे.

सलमान खान या संपूर्ण कार्यक्रमात त्याच्या खास दबंग अंदाजात दिसला. या अवॉर्ड फंक्शनला सलमाननं महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरसोबत हजेरी लावली होती. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. सलमाननं जाताना पुन्हा एकदा कॅमेऱ्याला पोझ दिली आणि तो निघाला. मात्र या सर्वात एक कुत्रा सुद्धा त्यांच्या मागे मागे जात असताना कॅमेऱ्यात कैद झाला. काही वेळातच त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी हा व्हिडीओ गंमत म्हणून शेअर केला, तर काहींनी मात्र या ठिकाणच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

नटून-थटून IIFA अवॉर्डला पोहोचलेल्या स्वरानं भर ग्रीन कार्पेटवर काढली सॅन्डल

 

View this post on Instagram

 

Every dog has his day this was his time to shine and he knew #SalmanKhan is a big animal lover ❤

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या अवॉर्डमध्ये दीपिका पदुकोणला स्पेशल अवॉर्ड फॉर बेस्ट अ‍ॅक्ट्रेस, रणवीर सिंहला बेस्ट अ‍ॅक्टर, आलिया भटला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस तर श्रीराम राघवन यांना बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड देण्यात आला.

The Zoya Factor: क्रिकेट, प्रेम आणि अंधश्रद्धा, अशी आहे सोनम-दुलकरची केमिस्ट्री

 

View this post on Instagram

 

#salmankhan arrive #iifa20 #iifaawards #iifa2019 #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो सध्या त्याचा आगामी सिनेमा 'दबंग 3' च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. सुरुवातीला या सिनेमाच्या सेटवरील काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर या सिनेमाच्या सेटवर मोबाईल फोन्सना बंदी घालण्यात आली होती. या सिनेमातून मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूड डेब्यू करत आहे. मात्र तिचा लुक अद्याप रिलीज केलेला नाही. या सिनेमाचं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार प्रभूदेवा करत आहे.

करोडपती होण्यासाठी हॉट सीटवर बसण्याची गरज नाही, घरबसल्या 'असे' जिंका 7 कोटी

===============================================================

VIDEO : 'सगळे सण एकत्र आले', खिचडीवाल्या 'करोडपती' बबिता ताडेंशी खास बातचीत

First published: September 20, 2019, 3:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading