मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘सामान्य माणसाला काम करु का देत नाही?’ लॉकडाउनच्या निर्णयावर अभिनेता संतापला

‘सामान्य माणसाला काम करु का देत नाही?’ लॉकडाउनच्या निर्णयावर अभिनेता संतापला

‘क्रिकेटपटू सामने खेळू शकतात मग सामान्य माणूस घराबाहेर का पडू शकत नाही?’; लॉकडाउनवरुन अभिनेता संतापला

‘क्रिकेटपटू सामने खेळू शकतात मग सामान्य माणूस घराबाहेर का पडू शकत नाही?’; लॉकडाउनवरुन अभिनेता संतापला

‘क्रिकेटपटू सामने खेळू शकतात मग सामान्य माणूस घराबाहेर का पडू शकत नाही?’; लॉकडाउनवरुन अभिनेता संतापला

मुंबई 8 एप्रिल: कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाऊनचा पर्याय स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. (lockdown in Maharashtra ) राज्यात रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) केला आहे. सरकारच्या या निर्णयावर प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण पटेल (Karan Patel) यानं आपला विरोध दर्शवला आहे. “क्रिकेटपटू त्यांचे सामने खेळू शकतात मग सामान्य माणूस घराबाहेर का पडू शकत नाही.” असा संतप्त सवाल त्यानं महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.

करणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट करत सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘कलाकार त्यांच्या आगामी प्रोजेक्टसचे चित्रीकरण करु शकतात. दिवस असो वा रात्र क्रिकेटपटू त्यांचे सामने खेळू शकतात. राजकिय नेते हजारो लोकांसह प्रचारसभा काढू शकतात. निवडणूका होऊ शकतात आणि तुम्ही घराबाहेर पडून मतदान कराल अशी अपेक्षा देखील बाळगली जाते मग एका सामन्य व्यक्तीला कामाला जाण्यापासून का रोखलं जात आहे? अशा आशयाची पोस्ट करणनं केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा - ‘ही तर मेहनतीची कमाई’; कार्तिकनं कोट्यवधींच्या कारचे घेतले आशीर्वाद

अवश्य पाहा - अनुष्का शर्मानं का केली होती ओठांची सर्जरी?; सांगितलं त्यामागचं खरं कारण...

महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन

राज्यात आठवड्याला लॉकडाऊनमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात सार्वजनिक आणि खासगी वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नसतील.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Lockdown