मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अनुष्का शर्मानं का केली होती ओठांची सर्जरी?; सांगितलं त्यामागचं खरं कारण...

अनुष्का शर्मानं का केली होती ओठांची सर्जरी?; सांगितलं त्यामागचं खरं कारण...

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं सुद्धा 2014 मध्ये आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया करून घेतली होती. आणि त्यांनतरची व्यथा तिनं एका मुलाखतीदरम्यान मांडली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं सुद्धा 2014 मध्ये आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया करून घेतली होती. आणि त्यांनतरची व्यथा तिनं एका मुलाखतीदरम्यान मांडली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं सुद्धा 2014 मध्ये आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया करून घेतली होती. आणि त्यांनतरची व्यथा तिनं एका मुलाखतीदरम्यान मांडली आहे.

मुंबई, 8एप्रिल: सध्या सुंदर दिसण्यासाठी, तसेच आपल्या शरीराला किंवा चेहऱ्याला हवा तसा आकार देण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया (surgery) करून घेतल्या जातात. बॉलीवूडमध्ये (bollywood) सुद्धा शस्त्रक्रिया करून घेणं हे काही नवीन नाही. श्रीदेवी (Shridevi) पासून ते कोयना मित्रा पर्यंत (Koena Mitra) अनेक अभिनेत्रींनी आपल्या चेहऱ्याच्या शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. असचं काहीसं अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) सुद्धा केलं होतं. आणि सोशल मीडियावर (social media) ट्रोल झाल्यानंतर, अनुष्कानं असं काहीसं उत्तर दिलं होतं. पाहा अनुष्का नेमकं काय म्हणाली होती.

बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी आपल्या शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. काहींचं त्यामुळे करिअर घडलं तर काहींचं करिअर पूर्णपणे नष्ट झालं होतं. काही अभिनेत्रींच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या होत्या. तर काही अशा अभिनेत्री होत्या ज्यांच्या या शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या होत्या. या अभिनेत्रींचे चेहरे खुपचं विचित्र झाले होते. सर्वसाधारण लोकांपेक्षा ते खुपचं वेगळे दिसत होते. आणि म्हणून त्यांना चित्रपटांपासून दूर जावं लागलं होतं.

त्यामुळे या अभिनेत्रींच्या शस्त्रक्रिया बऱ्याच चर्चेचा विषय बनल्या होत्या. असचं काहीसं झालं होतं, अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत. 2014 मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मानं सुद्धा आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया करून घेतली होती. मात्र त्यावेळी तिनं तो खुलासा केला नव्हता. जेव्हा अनुष्काकरण जोहरच्या एका कार्यक्रमामध्ये पोहचली होती. तेव्हा तिच्या चेहऱ्यामध्ये प्रचंड बदल जाणवू लागला. तिचे ओठ जेव्हा नेहमीपेक्षा खूपचं वेगळे दिसू लागले. तेव्हा तिच्या शस्त्रक्रियेची चर्चा रंगू लागली होती. अनुष्काच्या विचित्र दिसणाऱ्या ओठांवर लोकांनी मोठ्या प्रमाणात विनोद केले होते. सोशल मीडियावर अनेक मिम्स तयार करण्यात आले होते. इतकचं नव्हे तर अनुष्का शर्माला बदक सुद्धा म्हणण्यात आलं होतं.

(हे वाचा: सोनालीने नाही लपवली चेहऱ्यावरच्या डागांची समस्या; पहिल्यांदाच शेअर केला अनुभव)

2016 मध्ये ‘वोग’ या मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अनुष्कानं या गोष्टीचा स्वीकार केला होता. अनुष्कानं म्हटलं होतं, "मी कधीही काहीही लपवलं नाही. जेव्हा मी माझा ओठांवर शस्त्रक्रिया केली. तेव्हा मी हे सांगितलं होतं. खूप साऱ्या लोकांनी यासाठी माझं कौतुक केलं होतं. आणि मला धाडशी सुद्धा म्हटलं होतं कि मात्र मी हे सगळं माझा कामाचा एक भाग म्हणून केलं होतं. ‘बॉम्बे वेलवेट’ या चित्रपटामध्ये माझा भूमिकेसाठी मला ‘लीप जॉब’ करणं आवश्यक होतं. आणि म्हणून मी हे धाडस केलं होतं आणि मी ही गोष्ट कधीचं लपवली नाही. मला वाटत होतं की माझा चाहत्यांना देखील ही गोष्ट कळावी आणि त्यानंही कळावं की मीसुद्धा एक माणूस आहे मीसुद्धा अपरिपूर्ण असू शकते.  2014 मध्ये अनुष्कानं म्हटलं होतं की तिनं टेम्पररी लीप इनहान्सिग टूलआणि मेकअप टेक्निकचा वापर केला आहे.

2017 मध्ये अनुष्का शर्मानं भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली सोबत लग्नं केलं आहे. यादोघांची जोडी चाहत्यांना खुपचं पसंत आहे. या जोडीला नुकताच फेब्रुवारीमध्ये कन्यारत्न प्राप्त झालं आहे. तिचं नाव वामिका असं ठेवण्यात आलं आहे. तर अनुष्का आणि विराटला सोशल मीडियावर ‘विरुष्का’ म्हणून देखील ओळखलं जातं.

First published:
top videos

    Tags: Anushka sharma, Bollywood, Bollywood actress, Shridevi, Surgery