‘ही तर मेहनतीची कमाई’; कार्तिकनं कोट्यवधींच्या कारचे घेतले आशीर्वाद
‘ही तर मेहनतीची कमाई’; कार्तिकनं कोट्यवधींच्या कारचे घेतले आशीर्वाद
कार्तिकनं कोट्यवधी रुपयांची कार खरेदी केली. अन् या कारच्या तो पाया पडत होता. (Expensive car video) हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
मुंबई 8 एप्रिल: कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यानं आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. त्यामुळं त्यानं केलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत चाहत्यांना अप्रूप वाटतं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. अलिकडेच कार्तिकनं कोट्यवधी रुपयांची कार खरेदी केली. अन् या कारच्या तो पाया पडत होता. (Expensive car video)यावेळी चाहत्यांनी त्याचे काही व्हिडीओ काढले. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
कार्तिकनं लॅम्बोर्गिनी कार (Lamborghini car) खरेदी केली. भारतात या कारची किंमत जवळपास सहा कोटी रुपये इतकी आहे. अलिकडेच ही महागडी गाडी घेऊन तो आपल्या मित्राकडे जात होता. त्यावेळी त्यानं कारमध्ये बसण्यापूर्वी तिच्या पाया पडला. ज्या प्रमाणे आपण एखाद्या मोठ्या माणसाचे आशिर्वाद घेतो अगदी त्याच भावनेनं तो आपल्या कारचे आशिर्वाद घेत होता. त्यावेळी सभोवताली असलेल्या चाहत्यांनी त्याचे व्हिडीओ काढले. “इतक्या महागड्या वस्तूंची मला सवय नाही” अशा आशयाची कॅप्शन देत त्यानं देखील आपल्या कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अवश्य पाहा - अनुष्का शर्मानं का केली होती ओठांची सर्जरी?; सांगितलं त्यामागचं खरं कारण...
कार्तिकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर येत्या काळात तो अभिनेत्री कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्यासह ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. कार्तिकला कोरोना झाल्यामुळं सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण लांबणीवर गेलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनीज बाझमी कार्तिकच्या लवकरच परत येण्याची वाट पहात आहेत. याशिवाय त्याचा ‘धमाका’ हा चित्रपट देखील लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कार्तिक जान्हवी कपूरसोबत करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’मध्येही दिसणार आहे.
Published by:Mandar Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.