मुंबई, 10 सप्टेंबर : अभिनेता रितेश देशमुख, वरुण शर्मा आणि कुशा कपिल यांचा अमेझॉनवर सुरू असलेला ‘केस तो बनता है’ हा शो गेली काही दिवस चर्चेत आहे. शो मध्ये बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स हजेरी लावत आहे. ज्यांच्याबरोबर अभिनेता रितेश देशमुख धम्माल प्रश्नांसह वेगळी मज्जा आणत आहे. शोमध्ये एका पक्षाचा वकील रितेश असतो तर दुसऱ्या पक्षाचा वकील वरुण तर कुशा बऱ्याचदा जजच्या भूमिकेत दिसून येते. नुकताच या शोमध्ये बॉलिवडूचा प्रसिद्ध फिल्म मेकर करण जोहरनं हजेरी लावली होती. यावेळी करणनं बॉलिवूडच्या नेपोटिझमबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. करणला अनेकदा या विषयावरुन ट्रोल केलं जातं. बॉलिवूड आणि नेपोटिझम हा मुद्दा समोर आला की करण जोहर नेहमीच वादात येतो. मोठ्या प्रमाणात त्याला ट्रोल केलं जातं. आजवर अनेक मोठ्या स्टारकिड्सना करणनं त्याच्या सिनेमात संधी दिली आहे. त्यातील काही सिनेमे सुपर डुपर हिट गेले तर काही तोंडावर आपटले. अनेक स्टार किड्सना करणनं प्रमोट केलं आहे असा अरोप त्याच्यावर अनेकदा करण्यात आला आहे. केस तो बनता हैं या शोमध्ये देखील त्याला यावरुन प्रश्न विचारण्यात आले. हेही वाचा - Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’ ची रेकॉर्डब्रेक ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी शोमध्ये रितेश देशमुख करणला विचारतो, ‘मला सांग तू जेव्हा कोणत्याही कलाकाराला तुझ्या सिनेमात कास्ट करतो तेव्हा तू त्याच्यात काय पाहतोस, गुड लुक्स, गुड लुक्स आणि गुड लुक्स?’, या प्रश्नाचं उत्तर देत करण म्हणाला, ‘मी एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंटही पाहतो. कधी कधी मी टॅलेंट, टॅलेंट आणि टॅलेंटही पाहतो पण मला ते मिळत नाही’. करणनं इंनडारेक्टरली बॉलिवूडमधील नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला आहे. करण बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्ममेकर आहेच मात्र मधल्या काही वर्षांपासून करण अनेकदा वादात सापडला आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करणमुळे ही तो सतत चर्चेत असतो. शोमध्ये येणाऱ्या कलाकारांना वाह्यात प्रश्न विचारतो असं म्हणून त्याला बऱ्याचदा ट्रोल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर त्याच्या नो सेन्स क्लिप व्हायरल होत असतात. तर दुसरीकडे कलाकारांच्या उत्तरामुळे कॉफी विथ करण शो हिट देखील होताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.