मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' ची रेकॉर्डब्रेक ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' ची रेकॉर्डब्रेक ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

 बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर होय. या जोडप्याचा बहुप्रतीक्षित 'बह्मास्त्र' हा चित्रपट नुकतंच रिलीज झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 10 सप्टेंबर-   बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर होय. या जोडप्याचा बहुप्रतीक्षित 'बह्मास्त्र' हा चित्रपट नुकतंच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकले आहेत. त्यामुळे या दोघांसाठी हा चित्रपट फारच खास आहे. दरम्यान आता या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने 36.50 कोटींवरून 38.50 कोटींची कमाई केली आहे. नॉन हॉलिडे ओपनिंगच्या बाबतीत हिंदी व्हर्जनने इतकी कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. 'ब्रह्मास्त्र'ने कोरोना महामारीपूर्वी रिलीज झालेल्या 'सूर्यवंशी', 'संजू', 'टायगर जिंदा है' आणि 'धूम 3' सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या पहिल्या दिवसापेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मल्टिप्लेक्सच्या तीन मोठ्या चेनने देशभरातील 'ब्रह्मास्त्र'च्या सर्व व्हर्जनमधून 18.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्थरावर 18.50 कोटी रुपयांचं ओपनिंग कलेक्शन समोर आलं आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे.

(हे वाचा:Brahmastra: 'ब्रह्मास्त्र'मधील खलनायकाने वेधलं लक्ष; सौरभ गुर्जर नेमका आहे तरी कोण? )

'ब्रह्मास्त्र'साठी अयान मुखर्जीने तब्बल 9 वर्षे मेहनत घेतली आहे. हा चित्रपट खास बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा प्रचंड वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भेट झाली होती. त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते.चित्रपट रिलीजपूर्वीच त्यांनी लग्नदेखील केलं. आणि आता हे सेलिब्रेटी कपल आईबाबादेखील बनणार आहेत. त्यामुळे या दोघांसाठी हा चित्रपट फारच खास आहे.आलिया आणि रणबीर व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन,नागार्जुन आणि मौनी रॉय यांचासुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor