Home /News /entertainment /

Karan Johar News: 'माझ्या आयुष्यात एक लाईफ पार्टनर नाही...' करण जोहरने व्यक्त केली मोठी खंत!

Karan Johar News: 'माझ्या आयुष्यात एक लाईफ पार्टनर नाही...' करण जोहरने व्यक्त केली मोठी खंत!

बॉलिवूडचा केजो अर्थात सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. करण नुकताच एका मुलाखतीत खूप इमोशन झालेला दिसला.

    मुंबई 15 जून: बॉलिवूडचा केजो अर्थात दिग्ग्ज निर्माता दिग्दर्शक आणि धर्मा प्रॉडक्शनच्या सर्वेसर्वा (Karan Johar) करण जोहरने नुकतंच 50 व्य वर्षात पदार्पण केलं. करण गेली अनेकवर्ष बॉलिवूडवर अक्षरशः राज्य करत आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. करण जोहर हे नाव हिट्स-फ्लॉप्स पासून अनेक कॉंट्रोव्हर्सरीचा भाग राहील आहे. आपल्या 50 वर्षाच्या वयात करणने अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. त्याच आयुष्य अनेक वळणावर फिरत राहिलं आहे. त्याने त्याच्या आयुष्यात मागे वळून पाहाताना एक खूप मोठी खंत व्यक्त केली आहे. करणच्या आयुष्यात त्याने अनेक चांगल्या वाईट गोष्टी पाहिल्या आहेत. (Karan Johar Nepotism) नेपोटीझम साठी त्याच बदनाम झालेलं नाव असो किंवा आउटसायडर्स ना वागणूक देण्यात झालेली चूक असो. अगदी त्याच्या खाजगी आययशाबद्दल सुद्धा अनेकदा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. त्याच्या अस्तित्वाबद्दल आणि त्याच्या जेंडरबद्दल त्याने लहानपणापासून अनेक गोष्टी शान केल्या आहेत. ‘फिल्म कंपॅनिअन’शी बोलताना अनुपमा चोप्रा यांनी त्याला असाच काही खास प्रश्नांची उत्तरं द्यायला लावलं त्याला बोलतं केलं आहे. करणने आपल्या आयुष्यातील खंत (Karan Johar Biggest Regret In Life) व्यक्त करत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. “माझ्या आयुष्यात एकच खंत मला जाणवते ती म्हणजे लाईफ पार्टनर नसण्याची. मी माझ्या पर्सनल आयुष्याकडे लक्ष न देण्याचा निर्णय रिग्रेट करतो. एक पालक म्हणून मी आज समाधानी आहे आणि मी परिपूर्ण मानतो. मी अजून पाच वर्षांआधी मुलांचा निर्णय घेतला असता तरीही चाललं अस्त त्यातही मी उशीर केला. पण माझ्या आययष्यातली सगळ्यात मोठी खंत हीच आहे की एक निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून मी प्रोफेशनली जितक्या गोष्टींकडे लक्ष दिलं, एक साम्राज्य उभं करण्यासाठी जेवढं लक्ष दिल तेवढंच मी माझ्या पर्सनल आयुष्याकडे द्यायला हवं होतं. मला स्वतःला आणि माझ्या खाजगी आयुष्याला अनेकदा नमतं घ्यावं लागलं आणि जेवढं लक्ष द्यायला हवं होतं तेवढं तिकडे दिलं नाही असं मला वाटतं. आणि आता या गोष्टीला खूप उशीर झाला आहे. आता या टप्प्यावर येऊन मी लाईफ पार्टनर शोधणं बरोबर नाही. त्यावर लक्ष द्यायची वेळ आता निघून गेली.” करण आयुष्यभर प्रेम आणि लग्न या मामल्यात कधीच यशस्वी झाला नाही. तो असंही म्हणतो की “एक पालक असं, किंवा माझी मुलं कोणत्याही पद्धतीनं पार्टनर नसल्याची पोकळी भरून काढू शकत नाही.” करणे लहानपणीपासून वेगळं असण्याबद्दल टोमणे आणि टीकाच सहन केली. त्याच्या सेक्शुऍलिटीबद्दल सुद्धा बरेच प्रश्न आजपर्यंत विचारले गेले. हे ही वाचा- Brahmastra Trailer: 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर पाहून KRK एकदा नाही तर तीनवेळा खुर्चीवरून पडला, काय आहे नेमकं प्रकरण? वर्क फ्रंटवर बोलायचं तर करणने त्याच्या पन्नासाव्या वाढदिवशी बहुचर्चित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची रिलीज डेट रिव्हिल केली तसेच तो एका ऍक्शनपॅक चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याची घोषणा सुद्धा केली.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Bollywood News, Karan Johar

    पुढील बातम्या