मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

म्हशी पेक्षा शिंगं जड; सोनू सूद देणार गरजू कुटुंबाला म्हैस, मात्र घातलीय ही अट

म्हशी पेक्षा शिंगं जड; सोनू सूद देणार गरजू कुटुंबाला म्हैस, मात्र घातलीय ही अट

सोनू सूद आता एका गरजू कुटुंबाला म्हशी (Sonu Sood providing buffalo to the needy family) देणार आहे, मात्र त्यासाठी त्याने एक अट घातली आहे. म्हणतात ना..म्हशी पेक्षा शिंगं जड तशीच या अटीची चर्चा रंगली आहे.

सोनू सूद आता एका गरजू कुटुंबाला म्हशी (Sonu Sood providing buffalo to the needy family) देणार आहे, मात्र त्यासाठी त्याने एक अट घातली आहे. म्हणतात ना..म्हशी पेक्षा शिंगं जड तशीच या अटीची चर्चा रंगली आहे.

सोनू सूद आता एका गरजू कुटुंबाला म्हशी (Sonu Sood providing buffalo to the needy family) देणार आहे, मात्र त्यासाठी त्याने एक अट घातली आहे. म्हणतात ना..म्हशी पेक्षा शिंगं जड तशीच या अटीची चर्चा रंगली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 28 नोव्हेंबर - बॉलिवूड स्टार सोनू सूदला (Sonu Sood) लोक मसिहा मानतात. लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरितांना मदत केल्याबद्दल लोकांनी त्याचे खूप कौतुक केले. निस्वार्थीपणे लोकांना मदत केली, त्यामुळेच आज तो देशातील लोकांसाठी त्यांचा खऱ्या आयुष्यातील हिरो बनला आहे. सोनू सूदने दाखवलेल्या उदारतेमुळे (Sonu Sood News) तो आज करोडो हृदयांवर राज्य करत आहे.चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा सोनू हा खऱ्या आयुष्यातला हिरो आहे आणि त्याने ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. सोनू सूद आता एका गरजू कुटुंबाला म्हशी (Sonu Sood providing buffalo to the needy family) देणार आहे, मात्र त्यासाठी त्याने एक अट घातली आहे. सध्या या अटीची जास्त चर्चा रंगली आहे. म्हणतात ना..म्हशी पेक्षा शिंगं जड तशीच या अटीची चर्चा रंगली आहे.

सोनू सूदकडे मागितली होती मदत

सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर(Social Media) खूप सक्रिय असतो. आता लोक सोशल मीडियावर कोरोनाच्या काळात लोकांना मदत करणाऱ्या सोनू सूदकडे मदत मागतात. अलीकडेच, त्याने एक ट्विट पाहिले, ज्यामध्ये एका व्यक्तीने त्याला एका गरीब कुटुंबाला मदत करण्यास सांगितले होते.भानू प्रासन नावाच्या युजरने ट्विट करून लिहिले – हॅलो सोनू सूद सर… नालगोंडा जिल्ह्यातील हे कुटुंब… कोविडमुळे या कुटुंबाच्या प्रमुखाचा मृत्यू झाला. कुटुंबात तीन मुले असून या मुलांची आई कर्करोगाशी लढा देत आहे. त्यामुळे कृपया त्यांच्यासाठी म्हैस खरेदी करा, जेणेकरून ते आपला उदरनिर्वाह करू शकतील.

वाचा : Salman Khan च्या फॅन्सनी ओलांडली मर्यादा, Antim पाहिल्यानंतर सिनेमागृहात केला विचित्र प्रकार; Video शेअर करत सलमान म्हणाला

म्हैस देण्यापूर्वी ठेवली शर्त

हे ट्विट पाहिल्यानंतर सोनू सूदने रिट्विट केले आणि लिहिले- 'चल, बेटा, कुटुंबासाठी ही म्हैस घे. फक्त दुधात पाणी मिसळू नका.. आता त्याचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. हे ट्विट पाहिल्यानंतर चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत.

Sonu Sood, Sonu Sood News, Sonu Sood tweet, Sonu Sood providing buffalo to the needy family, सोनू सूद, बॉलीवुड , लॉकडाउन

कोरिओग्राफर शिव शंकर यांना देखील करणार मदत

नुकतेच सोनू सूदने दिग्गज कोरिओग्राफर शिव शंकर यांना मदत करण्याची घोषणा केली आहे. वास्तविक शिवशंकर देखील कोरोनाचे बळी ठरले होते, त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.आर्थिक अडचणींमुळे शिवशंकर यांच्या कुटुंबीयांना त्यांच्यावर उपचार करणे शक्य होत नाही. वंशी काका नावाच्या युजरने ट्विटरवर एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी शिवशंकर यांची गंभीर स्थिती आणि त्यांच्या कुटुंबाची बिकट आर्थिक परिस्थिती याबद्दल सांगितले आहे.

वाचा : VIDEO : उर्वशी रौतेलाने सोलमेटबद्दल खुलासा करताच चाहत्यांना झाली 'या' क्रिकेटरची आठवण

सोनू सूद यांनी शिवशंकर यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. सोनू सूद म्हटले होते की, 'मी कुटुंबाच्या संपर्कात आहे आणि त्यांचा जीव वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन.' सोनू सूद नंतर साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार शिव शंकर यांना धनुषने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. शिवशंकर हे साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Sonu Sood, Sonu sud