कपिल शर्मानं स्वतःच्याच शोमध्ये हात जोडून मागितली साराची माफी, पाहा VIDEO

कपिल शर्मानं स्वतःच्याच शोमध्ये हात जोडून मागितली साराची माफी, पाहा VIDEO

शोमध्ये कपिलनं सारा अली खानला असं काही म्हटलं की त्याला स्वतःच्याच शोमध्ये साराची हात जोडून माफी मागावी लागली.

  • Share this:

मुंबई, 09 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मागच्या काही दिवसांपासून त्याचा सिनेमा ‘लव्ह आजकल’चं प्रमोशन करत आहेत. हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेला रिलीज होणार आहे. त्याआधी या दोघांनीही सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली पण यावेळी या शोमध्ये कपिलनं सारा अली खानला असं काही म्हटलं की त्याला स्वतःच्याच शोमध्ये साराची हात जोडून माफी मागावी लागली.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावल्यावर कपिलनं साराला या सिनेमाबाबत काही प्रश्न विचारले. कपिल साराला म्हणाला, ‘या सिनेमाच्या पहिल्या भागात सैफ अली खाननं लीड रोल केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या भागात तू आहेत. मग तिसऱ्या भागात इब्राहिम आणि चौथ्या भागात तैमूर दिसणार का?’ त्यावर सारा म्हणते, ‘दुसऱ्या भागात मी नाही कार्तिक हा रोल करत आहे.’

सारा अली खान ते शाहिद कपूर, 'या' स्टारकिड भावंडांच्या वयात आहे मोठं अंतर

कपिल पुन्हा साराला म्हणतो, ‘लव्ह आजकल 2’ मध्ये  तू हिरोइन आहेस पहिल्या भागात सैफ सर होते. यावर सारा त्याला लगेच उत्तर देते, ‘पहिल्या भागात सैफ सर हिरोईन नव्हते, तु काय बोलत आहेस कपिल? या सिनेमात सैफच्या जागी कार्तिकनं ती भूमिका साकारली आहे.’ साराच्या युक्तावादावर कपिल तिची हात जोडून माफी मागतो. सारा आणि कपिलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

प्रियांका चोप्रा इव्हेंटसाठी वापरते एवढा महागडा ड्रेस, किंमत ऐकून व्हाल थक्क

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आजकल’चा हा पुढचा भाग आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष लागत आहे.

‘आतापर्यंत एकाही मुलानं मला...’ दिशा पाटनीनं व्यक्त केली तिच्या आयुष्यातली खंत

First published: February 9, 2020, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading