प्रियांका चोप्रा इव्हेंटसाठी वापरते एवढा महागडा ड्रेस, किंमत ऐकून व्हाल थक्क

प्रियांका चोप्रा इव्हेंटसाठी वापरते एवढा महागडा ड्रेस, किंमत ऐकून व्हाल थक्क

काही दिवसांपूर्वीच एका रिव्हिलिंग ड्रेसमुळे प्रियांकाच्या नावाची तुफान चर्चा झाली.

  • Share this:

मुंबई, 09 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. पण यासोबतच ती तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच एका रिव्हिलिंग ड्रेसमुळे प्रियांकाच्या नावाची तुफान चर्चा झाली. पण आता पुन्हा एकदा तिच्या जिराफ प्रिंटवाल्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. याचं कारण आहे तिच्या या ड्रेसची किंमत. प्रियांकाचा हा ड्रेस खूपच महागडा आहे.

प्रियांकानं मायामीमधील एका इव्हेंटमध्ये यलो आणि ब्राऊन प्रिंटचा एक शॉर्ट ड्रेस घातला होता. या फ्रंट डीप नेक ड्रेसमध्ये प्रियांका खूपच हॉट दिसत होती. या ड्रेसवर प्रियांकानं मल्टीलेयर चेन कॅरी केली होती. तसेच या ड्रेसला बेल्टनं टाय केलं होतं. या ड्रेसमध्ये प्रियांकाचा लुक एकदम खुलून दिसत होता. मात्र तुम्हाला माहित आहे का या सिंपल दिसणाऱ्या ड्रेसची किंमत किती होती.

VIDEO : प्रमोशनमध्ये अचानक बिघडली साराची तब्येत, उचलून नेताना दिसला कार्तिक

या इव्हेंटमध्ये प्रियांकानं Dior ब्रॅडचा ड्रेस घातला होता. या ड्रेसची किंमत 3,200 पौंड आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार ही किंमत 2,95, 046 रुपये एवढी आहे. या ड्रेसवर प्रियांकानं जो बेल्ट लावला आहे. त्याची किंमत 2150 ब्रिटीश पौंड एवढी आहे. तर भारतीय चलनानुसार याची किंमत 1,98 086 रुपये आहे. त्यामुळे जर हा ड्रेस आणि बेल्टची किंमत एकत्र केली तर या ड्रेसची एकूण किंमत 493,132 रुपये आहे.

प्रभासची गर्लफ्रेंड भारतीय क्रिकेटरच्या प्रेमात, लवकरच अडकणार विवाह बंधनात?

 

View this post on Instagram

 

Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रानं ग्रॅमी अवॉर्डमध्ये रिलिव्हिंग ड्रेस घातल्यानं सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. या ड्रेसचा डीप नेक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. ज्यामुळे प्रियांकाला ट्रोलही व्हावं लागलं होतं. प्रियांकाचा हा ड्रेस डिझायनर Ralph And Russo नं डिझाइन केला होता.

Love Story : ...आणि विवाहित अनुपम खेर यांना स्वप्नातली राजकुमारी अखेर सापडली!

First published: February 9, 2020, 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading