जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘आतापर्यंत एकाही मुलानं मला...’ दिशा पाटनीनं व्यक्त केली तिच्या आयुष्यातली खंत

‘आतापर्यंत एकाही मुलानं मला...’ दिशा पाटनीनं व्यक्त केली तिच्या आयुष्यातली खंत

‘आतापर्यंत एकाही मुलानं मला...’ दिशा पाटनीनं व्यक्त केली तिच्या आयुष्यातली खंत

दिशानं ‘मलंग’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा मलंग सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मर्डर मिस्ट्री आणि दिशा पाटनी, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या सिनेमातील दिशाच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. पण सिनेमाला एवढं यश मिळत असतानाही दिशाच्या आयुष्यात मात्र नेहमीच एक खंत कायम आहे. याचा खुलासा तिनं नुकताच एका मुलाखतीत केला. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार दिशानं ‘मलंग’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिनं तिच्या आयुष्यातली एक खंतही बोलून दाखवली. एका मुलाखतीत तिला आतापर्यंत किती प्रपोजल्स आले आहेत आणि किती लोकांना तिनं नकार दिला आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना दिशा म्हणाली, ‘ही मला नेहमी वाटणारी खंत आहे की आतापर्यंत मला कोणीच प्रपोज केलं नाही. कारण मी शाळेत असताना टॉमबॉय होते.’ प्रभासची गर्लफ्रेंड भारतीय क्रिकेटरच्या प्रेमात, लवकरच अडकणार विवाहबंधनात?

जाहिरात

दिशा तिच्या लव्ह लाइफ बद्दल बोलताना म्हणाली, ‘माझे वडील पोलीस होते. त्यामुळे कोणी शाळेत अशी हिम्मत केली नाही आणि मग कॉलेजमध्येही असंच झालं. त्यानंतर मी बॉलिवूडमध्ये आले. पण या ठिकाणी माझे काही मोजकेच मित्र आहेत मी फारशी पार्ट्यांमध्ये जात नाही. कोणाला भेटत नाही. माझं आयुष्य खूपच दुःखानं भरलेलं आहे.’ Love Story : …आणि विवाहित अनुपम खेर यांना स्वप्नातली राजकुमारी अखेर सापडली!

दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफच्या नात्याबद्दल नेहमीच बोललं जातं मात्र या दोघांनी नेहमीच आम्ही दोघंही एकमेकांचे चांगले फ्रेंड आहोत असंच सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी टायगरला त्याच्या चाहत्यानं दिशाला डेट करत आहेस का असा प्रश्न विचारला होता. ज्याचं उत्तर देताना टायगरनं मी तिच्या लायक नाही असं उत्तर दिलं होतं. तसेच एका चॅट शोमध्ये दिशानं टायगरला डेट करत नसल्याचं सांगत तो 100% सिंगल असल्याचं म्हटलं होतं. स्प्लिट्सव्हिला फेम मायराने टॉपलेस फोटो शेअर करत साजरा केला ‘रोज डे’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात