मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू; अवयव दान करणार कुटुंबीय

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू; अवयव दान करणार कुटुंबीय

उपचारादरम्यान ते कोमात केले अन् अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विजय यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपचारादरम्यान ते कोमात केले अन् अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विजय यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपचारादरम्यान ते कोमात केले अन् अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विजय यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई 14 जून: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय (sanchari vijay) यांचं बाईक अपघातामध्ये निधन झालं आहे. विजय हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेते होते. शनिवारी सकाळी बाईकवरुन प्रवास करताना त्यांचा अपघात झाला. (Kannada actor Sanchari Vijay dies) या अपघातात त्यांच्या मेंदूला जबरदस्त जखम झाली. त्यांना त्वरीत एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. (sanchari vijay accident) परंतु उपचारादरम्यान ते कोमात केले अन् अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विजय यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विजय यांना बाईकवरुन प्रवास करायला आवडायचं. पाऊस पडल्यामुळं रस्ते गुळगुळती झाले होते. अन् या गुळगुळीत रस्त्यावरच त्यांची बाईक घसरुन अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला होता. आसपासच्या लोकांनी त्यांना रुग्णालयात भरती केलं. परंतु तो पर्यंत डोकं फुटल्यामुळं भरपूर प्रमाणात रक्त वाहून गेलं. यामुळं ते कोमात गेले. सलग 48 तास तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु त्यांचं शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

‘या बाईला कोणीतरी आवरा’; अजब योगा व्हिडीओंमुळं राखी सावंत ट्रोल

विजय यांचे मोठे भाऊ सिद्धेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे अवयव ते दान करणार आहेत. या अवयवांच्या माध्यमातून विजय आपल्यात कायम जिवंत राहतील, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली. 2015 साली 'नानु अवानल्ला अवालु' या चित्रपटातून संचारी विजय यांनी आपली ओळख निर्माण केली होती. यामध्ये केलेल्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ‘अॅक्ट 1978’ या चित्रपटात ते अखेरचे झळकले होते. लॉकडाउनमध्ये विजय यांनी लोकांच्या मदतीसाठीही हात पुढे केला होता. यूसायर या टीमशी जोडून घेत ते करोना संक्रमित लोकांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत होते. ही माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांनाही दिली होती.

First published:
top videos

    Tags: Accident, Actor, Bike accident, South indian actor