मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कौतुकास्पद! जंगलाच्या विकासासाठी प्रभासची 2 कोटींची मदत, दत्तक घेतलं 1650 एकर राखीव वनक्षेत्र

कौतुकास्पद! जंगलाच्या विकासासाठी प्रभासची 2 कोटींची मदत, दत्तक घेतलं 1650 एकर राखीव वनक्षेत्र

बाहुबली 'प्रभास'ने (Actor Prabhas) मोठ्या स्क्रीनवर त्याच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. मात्र आता त्याने हाती घेतलेल्या एका उपक्रमामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे.

मुंबई, 08 सप्टेंबर : बाहुबली 'प्रभास'ने (Actor Prabhas) मोठ्या स्क्रीनवर त्याच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. मात्र आता त्याने हाती घेतलेल्या एका उपक्रमामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे. अभिनेता प्रभासने पुढाकार घेत हैदराबादजवळील काझिपल्ली आरक्षित वनातील 1650 एकर क्षेत्र दत्तक घेतले आहे आणि त्याचा विकास करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांने या राखीव जंगलाच्या विकासासाठी दोन कोटी रुपये वन अधिकाऱ्यांना देऊ केले आहेत. प्रभासने स्वत: इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना प्रभासने असे कॅप्शन दिले आहे की, 'मी हैदराबादजवळील काझिपल्ली राखीव वनक्षेत्रातील 1650 एकर क्षेत्र दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याची जबाबदारी घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. एक निसर्गप्रेमी या नात्याने माझा असा विश्वास आहे की यामुळे शहरासाठी एक 'Lung Space' तयार होईल. मी राज्यसभा खासदार संतोष कुमार यांचे त्यांच्या सहकार्यासाठी आभार मानतो. त्याचप्रमाणे तेलंगणा सरकारचे आणि वनविभागाचेही मला ही संधी देण्यासाठी मी आभार मानू इच्छितो.'

(हे वाचा-सिनेसृष्टीला मोठा धक्का, तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी काळाच्या पडद्याआड)

दरम्यान याआधीही बाहुबली प्रभासच्या दिलदार स्वभावाचा प्रत्यय आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या जिम ट्रेनरला महागडी कार गिफ्ट दिल्यानंतर प्रभास चर्चेत आला होता. बाहुबली सिनेमात एक चांगला राजा दाखवला होता, तसाच तो खऱ्या आयुष्यातही तसाच आहे. प्रभासने आपल्या जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी ला मेड इन इंडिया असलेली रेन्ज रोवर वेलार (Range Rover Velar SUV) भेट दिली आहे. या SUV ची किंमतही तब्बल 73.30 लाख इतकी आहे.

First published:
top videos

    Tags: Prabhas