Home /News /entertainment /

अवैध बांधकामाचा आरोप करत BMCची कंगनाला नोटीस, तरीही अभिनेत्रीने मानले चाहत्यांचे आभार

अवैध बांधकामाचा आरोप करत BMCची कंगनाला नोटीस, तरीही अभिनेत्रीने मानले चाहत्यांचे आभार

मुबंई महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे.

    मुंबई, 08 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) 9 सप्टेंंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. तत्पूर्वी मुंबईत विविध हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुबंई महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे. परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे. दरम्यान बीएमसीने हे पाऊल उचलल्यानंतर कंगनाने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने असे तिच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'माझ्या सोशल मीडियावरील मित्रपरिवाराकडून टीका सहन करावी लागल्यानंतर बीएमसीने माझ्या कार्यालयावर बुलडोझर घेऊन न घेता त्यांनी त्याठिकाणी सुरू असलेले लिकेजचे काम थांबवण्याची नोटीस लावली आहे. मित्रांनो मी खूप मोठी जोखीम पत्करली असेन पण मला तुमच्याकडून खूप प्रेम आणि सहकार्य मिळाले.' (हे वाचा-जंगलाच्या विकासासाठी प्रभासची 2 कोटींची मदत,दत्तक घेतलं 1650 एकर राखीव वनक्षेत्र) दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयाचा मुंबई महापालिकेच्या टीमने सोमवारी दौरा केला होता. त्यावेळी तिचे ऑफिस पालिकेकडून पाडले जाऊ शकते अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. (हे वाचा-सिनेसृष्टीला मोठा धक्का, तेलुगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी काळाच्या पडद्याआड) अशाप्रकारे कोणतेही पाऊल न उचलता बीएमसीने तिच्या कार्यालयाबाहेर म्यून्सिपल कॉर्पोरेशन कायदा सेक्शन 354/ए अंतर्गत नोटीस जारी केली आहे. कंगनाने याआधी दावा केला आहे की तिची प्रॉपर्टी कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर किंवा अवैध नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: BMC, Kangana ranaut

    पुढील बातम्या