दुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारी कनिका काही वर्षांपूर्वी घेणार होती स्वत:चा जीव

दुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारी कनिका काही वर्षांपूर्वी घेणार होती स्वत:चा जीव

बेबी डॉल गायिका कनिका कपूरची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कनिकाने तिच्या आयुष्यातील खडतर काळाबाबत सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : बॉलिवूडची बेबी डॉल गायिका कनिका कपूर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus Positive) आढळून आल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. ती कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वत्र जबरदस्त हंगामा झाला होता. कारण कनिका काही पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. असंही बोललं जातं की कनिका कपूर लंडनवरून परतल्यानंतर विमानतळावर स्क्रिनींग केलं नव्हतं. मात्र कनिका कपूरने हे आरोप फेटाळले आहेत. सध्या कनिका कपूरवर उपचार सुरू आहेत. दरम्यान याच काळात कनिका कपूरची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कनिकाने तिच्या आयुष्यातील खडतर काळाबाबत सांगितलं आहे.

(हे वाचा-कोरोनाचा कहर, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन)

कनिकाने लखनऊमध्ये शिक्षण पूर्ण केलं असून वयाच्या 18 व्या वर्षीच तिने लग्न केले होते. कनिका 1997 मध्ये भारत सोडून पति राज चंदूकबरोबर भारत सोडून लंडनमध्ये राहायला गेली. या दोघांनी तीन मुलं आहेत. त्यांच्या लग्नामध्ये समस्या निर्माण झाल्याने 2010 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या पूर्वाआयुष्याबद्दल भाष्य केलं होतं.

आत्महत्या करणार होती कनिका

घटस्फोट झाल्यानंतर कनिका भारतात परतली, मात्र या काळ तिच्यासाठी अत्यंत वाईट होता. एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, तिला आयुष्य संपवावं असं देखील वाटत होतं. कनिका म्हणाली की, ‘असं तेव्हा होतं, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात. एका वाईट काळातून तुम्ही जात असता, त्यातच वकील पैसे मागत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला 3 मुलं आहेत, ज्यांना शाळेतून काढून टाकलं आहे कारण तुम्ही त्यांच्या फी नाही भरल्या आहेत.’

(हे वाचा-हेमा मालिनीसाठी धर्मेंद्र यांनी बुक केलं पूर्ण हॉस्पिटल, कारण वाचून व्हाल हैराण)

ती पुढे म्हणाली की, ‘ मी तक्रार नाही करत आहे. पण जेव्हा मी हार पत्करण्याच्या वाटेवर होते, तेव्हा मला देवाने ‘बेबी डॉल’ गाण्याची संधी मिळाली. तेव्हा मात्र माझ्याकडे कोणतही हार मानण्याचे कारण नव्हतं.’

First published: March 23, 2020, 11:28 AM IST

ताज्या बातम्या