Home /News /entertainment /

हेमा मालिनीसाठी धर्मेंद्र यांनी बुक केलं होतं संपूर्ण हॉस्पिटल, कारण वाचून व्हाल हैराण

हेमा मालिनीसाठी धर्मेंद्र यांनी बुक केलं होतं संपूर्ण हॉस्पिटल, कारण वाचून व्हाल हैराण

धर्मेंद्र आणि हेमा यांच्या लव्हस्टोरी बद्दल तर सर्वांनाच माहित आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसाठी पूर्ण हॉस्पिटल बुक केलं होतं.

  मुंबई, 22 मार्च : बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्याकडे एक आयडियल कपल म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल तर सर्वांनाच माहित आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की एकदा धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसाठी अख्खं हॉस्पिटल बुक केलं होतं. नुकतीच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. ज्यामध्ये हेमा यांनी हा किस्सा प्रेक्षकांशी शेअर केला. याशिवाय या दोघांनी यावेळी खूप धमालही केली. ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी या शोमध्ये धर्मेंद्र यांच्याबद्दल अनेक गुपितं शेअर केली आणि यासोबतच धर्मेंद्र यांच्याबद्दल एक धम्माल किस्सा शेअर केला. त्यांनी सांगितलं, इशा आणि अहानाच्या जन्माच्या वेळी संपूर्ण हॉस्पिटल बुक केलं होतं. याचं कारण हे होतं की त्यांना यावेळी पूर्ण प्रायव्हसी हवी होती. त्यावेळी डॉक्टरांचं पूर्ण निर्सिंग होम असे. जे धर्मेंद्र यांनी पूर्ण बुक केलं होतं. धर्मेंद्र यांचं त्यांच्या मुलींवर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांचं हे वागणं स्वाभाविक होतं. Coronavirus बाबत निष्काळजीपणावर भाईजानची सटकली, Video मधून व्यक्त केला राग
  सध्या धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी इशा देओल सध्या सिनेमांपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच सक्रिय आहे. लवकरच इशा तिचं नवं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. ज्याच्या प्रमोशनसाठी या सर्वांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. इशाच्या पुस्तकाचं नाव Amma Mia असून हे पुस्तक पेरेंटिंगवर आधारित आहे. Coronavirus Outbreak दरम्यान मलायका करतेय खास काम, Video शेअर करून म्हणाली... कपिल शर्मा शोमध्ये इशाला पेरेंटिंग बद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्व प्रश्नांची उत्तरं तर इशानं दिलीच मात्र यासोबत पेरेंटिंगच्या संदर्भात आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी प्रेक्षकांशी शेअर केल्या. कपिल शर्मा शोमध्ये ही पहिलीच वेळ होती की हेमा आणि धर्मेंद्र यांनी एकत्र या शोमध्ये हजेरी लावली होती. अंकिता लोखंडे मारतेय चक्क आरशासोबत गप्पा! बाथरोबमध्ये दिसला BOLD अंदाज
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या