Home /News /entertainment /

कोरोनाचा कहर, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

कोरोनाचा कहर, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. इटली, अमेरिका, चीन आणि इराण या देशांमध्ये अनेक लोकांनी जीव गमावले आहेत.

    लंडन, 22 मार्च : कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. इटली, अमेरिका, चीन आणि इराण या देशांमध्ये अनेक लोकांनी जीव गमावले आहेत. यातच आता हॉलीवूड अभिनेत्रीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ट्रान्सफर्मर्स आणि मॅन्सफिल्ड पार्क या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री सोफिया माइल्स हिच्या वडिलांचे कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे निधन झालं आहे. त्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं होतं. अभिनेत्रीने सोशल मीडियावर वडिलांच्या निधनाची बातमी सांगितली. अभिनेत्रीने म्हटलं की, पीटर माइल्स यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. माझ्या वडिलांचं काही तासांपूर्वीच निधन झालं. कोरोना व्हायरसमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या निधनांची माहिती देताच तिचे सांत्वन कऱणारे मेसेज अनेक हॉलिवूड कलाकारांनी आणि मान्यवरांनी केले आहेत. याआधी सोफीने ट्विटरवर वडील आणि भावासोबत एक फोटो शेअर केला होता. यात म्हटलं होतं की, माझे वडील, भाऊ आणि मी. एक आठवणीतला फोटो शेअर करण्यासाठी. तसंच तिनं वडिलांवर उपचार सुरु असतानाही एक फोटो शेअर केला होता. त्यात वड़िलांच्या शेजारी मास्क आणि ग्लोव्हज घालून ती उभा असलेली दिसते. हे वाचा : आई दवाखान्यात मात्र महाराष्ट्राचा लढवय्या लेक कोरोनाशी लढतोय, टोपेंचं कौतुक कोरोना व्हायरसच्या धास्तीने अनेक हॉलिवूड कलाकारांनी टेस्ट करून घेतली आहे. यामध्ये अॅक्टर टॉम हॅक्स आणि त्याची पत्नी, अॅक्ट्रेस रिटा विल्सन, एडरिस एल्बा, राशेल मॅथ्यू यांचा समावेश आहे. भारतात बॉलिवूड अभिनेत्री कनिका कपूरला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. तिच्यावर लखनऊमध्ये उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 13 हजार लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. हे वाचा : खूशखबर! फक्त 45 मिनिटांत होणार कोरोनाची टेस्ट, 'या' देशाला मिळालं यश
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या