मुंबई, 06 एप्रिल : महानायाक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पुन्हा एकदा त्यांच्या ट्वीटमुळे ट्रोलिंगची शिकार बनले आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या या खडतर परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी रात्री 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत घरातील लाइट घालवून दिवे लावण्याचं आवाहन केले होते. त्यानुसार देशभरातील अनेक भागात नागरिकांनी त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये, गच्चीत दिवे लावले होते. यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं आहे.ज्यामुळे त्यांच्यावर ट्विटर युजर्सकडून टीका केली जात आहे. (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चर्चेत, शाहरूखचा प्रसिद्ध डायलॉग VIRAL ) बिग बी अमिताभ यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक जगाचा नकाशा आहे, ज्यामध्ये केवळ भारत झगमगत असलेलं पाहायला मिळत आहे. रितीका जैन या ट्विटर युजरने हे ट्वीट केले आहे, ज्याला अमिताभ यांनी रिट्वीट केले आहे. मुळ ट्वीटमध्ये असं लिहिण्यात आले आहे की, ‘जेव्हा पूर्ण जग अंधारात होतं, भारत चमकत होता.आजचा हा फोटो सर्वकाही सांगत आहे.’ हे ट्वीट करताना ट्वीटर युजरने अमिताभ यांना टॅग केले आहे. त्यामुळे अमिताभ यांनी ट्वीट रिट्वीट करत म्हटलं आहे की, ‘संपूर्ण जग आपल्याला पाहत आहे. आपण सर्व एक आहोत.’
या ट्वीटमुळे अमिताभ बच्चन यांना अनेक ट्विटर युजर्सनी ट्रोल केले आहे. कुणी म्हटलं आहे की, ‘खोट्या बातम्या पसरवण थांबवा’, तर कुणी या फोटोला नासाचा फोटो असं संबोधित खिल्ली उडवली आहे. एका युजरने फोटो शेअर करण्याआधी तपासून पाहण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने तर म्हटले आहे की, ‘मला आश्चर्य वाटतं अभिषेक बच्चनला तंत्रज्ञानाबद्दल एवढ्या गोष्टी माहित असूनही तो आपल्या वडिलांना फॉरवर्ड मेसेजबद्दल का नाही शिकवत.’
I can understand your love for the Country. Stay real around fake..
— Deepika Pushkar Nath (@DeepikaPNath) April 5, 2020
Sir, Zoom karke dekhiye. Yeh dikhega. pic.twitter.com/HCiHbVsnQf
— Kumar Keshav (@KineticKeshav) April 5, 2020
काही दिवसांपूर्वी सुद्धा अमिताभ यांनी एक फेक फॉरवर्ड ट्वीटरवर पोस्ट केले होते. त्यानंतर त्यांनी ते डिलिट देखील केले होते.