जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / करण जोहरच्या त्या पोस्टनंतर कंगनाचं सणसणीत टीकास्त्र; म्हणाली 'एकेकाळी माझा अपमान केला आता....

करण जोहरच्या त्या पोस्टनंतर कंगनाचं सणसणीत टीकास्त्र; म्हणाली 'एकेकाळी माझा अपमान केला आता....

कंगना रनौत- करण जोहर

कंगना रनौत- करण जोहर

करणने काल केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. आता त्यानंतर कंगनाने त्याच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 एप्रिल :  बॉलिवूडचा निर्माता करण जोहर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. करण जोहरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये त्याने स्वतः कबूल केलं आहे की त्याने अनुष्का शर्माचे करिअर संपवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओनंतर सगळीकडे एकच खळबळ माजली. नेटकऱ्यांनी करणवर निशाणा साधत त्याला तुफान ट्रोल केलं. एवढंच नाही तर काही बॉलिवूडकरांनी देखील त्याच्यावर टीका केली. करण जोहरच्या या जुन्या व्हिडिओचा संदर्भ देत कंगना रणौत, विवेक अग्निहोत्री आणि लेखक-संपादक अपूर्व असरानी यांनी त्याच्यावर निशाणा साधला. त्याला प्रत्युत्तर म्हणून करणने काल केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. आता त्यानंतर कंगनाने त्याच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी करणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने ‘मला अनुष्का शर्माचं करिअर खरंच उद्ध्वस्त करायचं होतं. कारण जेव्हा मला आदित्य चोप्राने तिचा फोटो दाखवला तेव्हाच मी तिला घेऊ नकोस असा सल्ला आदित्यला दिला होता.’ असे त्याने कबूल केलं होते. त्यानंतर त्याच्यावर  अनेक आरोप झाले. Shefali Shah: भर बाजारात शेफाली शहासोबत घडलं धक्कादायक कृत्य; खुलासा करत म्हणाली ‘सांगायलाही लाज…’ स्वतःवर होणारे आरोप आणि टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी करण जोहरने हिंदी कविता पोस्ट केली होती. त्याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘लगा लो इल्जाम….हम झुकने वालों में से नहीं, झूठ का बन जाओ गुलाम,हम बोलने वालों में से नहीं,जितना नीचा दिखाओगे,जितना आरोप लगाओगे,हम गिरने वालों में से नहीं, हमारा कर्म हमारी विजय है, आप उठा लो तलवार, हम मरने वालों में से नहीं।’ असे करण जोहरने यात म्हटले आहे.

News18

करण जोहरने या पोस्टमधून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिल्याचेही बोललं गेलं. पण करणच्या या पोस्टनंतर आता कंगनाने त्याच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले होते, ‘एक काळ असा होता जेव्हा चाचा चौधरी आणि उच्चभ्रू नेपो माफिया राष्ट्रीय टेलिव्हिजनवर माझा अपमान करत असत कारण तेव्हा मला चांगलं इंग्रजी बोलता येत नव्हतं… पण आज माझ्यामुळे तुझं हिंदी सुधारलं आहे, आता पुढे बघा काय होते ते…’ असं म्हणत कंगनाने करणला टोमणा मारला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बऱ्याच कलाकारांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा आरोप करण जोहरवर बऱ्याचदा झाले आहेत. मध्यंतरी प्रियांका चोप्राने देखील असाच खुलासा केला होता.  एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की, तिने बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये का गेली? यावेळी तिने इंडस्ट्रीतील काही लोकांशी मतभेदांमुळे तिला हवे तसे काम मिळत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे करणवर निशाणा साधल्याचे बोललं गेलं. त्यावेळी देखील कंगनाने प्रियांका चोप्राचं समर्थन करत तिला पाठींबा दिला आणि करणवर निशाणा साधला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात