जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Shefali Shah: भर बाजारात शेफाली शहासोबत घडलं धक्कादायक कृत्य; खुलासा करत म्हणाली 'सांगायलाही लाज...'

Shefali Shah: भर बाजारात शेफाली शहासोबत घडलं धक्कादायक कृत्य; खुलासा करत म्हणाली 'सांगायलाही लाज...'

शेफाली शाह

शेफाली शाह

नुकतंच शेफाली शाहसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. याविषयी अभिनेत्रीने नुकताच खुलासा केला आहे. शेफाली शहाने केलेला हा खुलासा ऐकून चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. नक्की काय घडलं या अभिनेत्रीसोबत जाणून घ्या…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 एप्रिल : अभिनेत्री शेफाली शाह ही इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रत्येक चित्रपटातील त्यांच्या दमदार भूमिकेने चित्रपटसृष्टीत त्यांनी एक खास आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अभिनयाचं तर कौतुक होतंच पण स्पष्टवक्तेपणाचं देखील नेहमीच कौतुक होतं. शेफाली शाहांच्या खाजगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. नुकतंच त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. याविषयी अभिनेत्रीने नुकताच खुलासा केला आहे. शेफाली शहाने केलेला हा खुलासा ऐकून चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. नक्की काय घडलं या अभिनेत्रीसोबत जाणून घ्या… शेफाली शाह यांनी अलीकडेच एका पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. या ठिकाणी त्या मीरा नायरच्या ‘मान्सून वेडिंग’ मधील त्यांच्या दमदार अभिनयाबद्दल भरभरून बोलल्या. या चित्रपटात त्यांनी लहानपणी लैंगिक शोषण झालेल्या रिया वर्माची भूमिका साकारली होती. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, लिलेट दुबे, वसुंधरा दास, विजय राज, रजत कपूर, रणदीप हुड्डा आणि सोनी राजदान यांच्याही भूमिका आहेत. 12 कोटींचा कोठा अन् 3 कोटींचा महाल; देवदास साठी संजय लीला भन्साळींनी खर्च केले इतके पैसे या चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना शेफालीने तिचे अनुभव सांगितले. त्यांनी ANI पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले कि, ‘जसे मी आधी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकजण त्यातून गेला आहे. मला आठवतं की जेव्हा मी गर्दीच्या ठिकाणी फिरत होते तेव्हा मला अनेकदा अयोग्यरित्या स्पर्श केला गेला. तेव्हा मला खूप किळसवाणं वाटलं. याविषयी मी कधीही काहीही बोलले नाही कारण तो प्रकार खूपच लाजिरवाणा होता.’  असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

जाहिरात

या पॉडकास्टमध्ये त्यांना पुढे विचारण्यात आलं की, ‘तुम्ही या साठी नंतर काही केलं का?’ त्यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली कि, ‘होय. मी तुझ्याशी सहमत आहे. अनेकांना वाटतं, मी काही केलं का? तुम्हाला अपराधी वाटते, तुम्हाला लाज वाटते आणि तुम्ही विसरता. आम्ही ते आत लपवून ठेवतो. खरे सांगायचे तर, या प्रकारावर मी कोणाशी बोलले नसले तरी या चित्रपटात माझ्या अभिनयातून मी ते प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.’ असं त्या म्हणाल्या. ‘मान्सून वेडिंग’ हा एकमेकांमधील रोमँटिक नाती गुंफण्यावर आधारित होता ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य दिल्लीतील लग्नाला उपस्थित राहण्यासाठी एकत्र येतात. 2001 कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या मार्चे डू फिल्म विभागात त्याचा प्रीमियर झाला. हा चित्रपट गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी देखील नामांकित झाला होता. एवढंच नाही तर व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमानं गोल्डन लायन पुरस्कार देखील जिंकला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

शेफाली ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वक्त’, ‘गांधी, माय फादर’ आणि ‘दिल धडकने दो’ यासह अनेक हिट चित्रपटांचा भाग आहे. गेल्या वर्षी तिने ‘जलसा’, ‘डार्लिंग्स’ आणि ‘डॉक्टर जी’ मध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात