मुंबई, 05 नोव्हेंबर : कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल ना सिने इंडस्ट्रीशी जोडलेली आहे. ना तिनं कोणत्या सिनेमात काम केलंय. पण तरीही ती नेहमीच तिच्या वादग्रस्त ट्वीट्समुळे चर्चेत असते. रंगोलीनं स्वतःला कंगनाची मॅनेजर म्हणून घोषित केलं आहे. प्रत्येक दिवशी ती काही ना काही ट्वीट करुन नवा वाद उभा करत असते. नुकतंच तिनं बॉलिवूडच्या फिल्म मेकर्सबद्दल ट्वीट केलं असून यात तिनं निर्माता करण जोहरवर निशाणा साधला आहे. करण जोहरचं नाव घेत रंगोलीनं बॉलिवूडमध्ये तयार होत असलेल्या ऐतिहासिक सिनेमांना सॉफ्ट पॉर्न म्हटलं आहे. रंगोलीनं करण जोहरचा आगामी सिनेमा ‘तख्त’बद्दल त्याच्यावर निशाणा साधला आहे. रंगोलीनं लिहिलं, ‘…आणि ही आश्चर्याची गोष्ट नाही की, आमचा लाडका करण जोहर क्रूर खूनी नात्यांवर सिनेमाची निर्मिती करणार आहेत. तो औरंगजेबची क्रूरता अॅब्स आणि सेक्सुअल रिलेशनशिपच्या माध्यमातून साकारणार आहे.’ रंगोलीच्या या ट्वीटवर काहींनी तिचं समर्थन केलं आहे तर काहींनी मात्र करण जोहरची बाजू घेतली आहे. त्यानंतर रंगोलीनं याबाबत एका मागोमाग एक अनेक ट्वीट केले आहेत.
स्टार होताच बदलला रानू मंडलचा ‘सूर’, हात लावल्यानं चाहतीवर भडकली; पाहा VIDEO
तिनं तिच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलं, या मूर्ख फिल्म मेकर्सना ऐतिहासिक भूमिकांचं सेक्सुअल चित्रण करण्यापासून थांबवायला हवं. हे सर्व देशातील डेमोक्रसी संपली असं म्हणून रडतील आणि देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमानित करतील त्याआधी मी अधिकाऱ्यांकडे निवेदन करते की, यांच्या स्क्रिप्ट पहिल्या जप्त करा.
तुझ्या रिअल लाइफमधली ‘ती’ कोण? प्रश्न ऐकून गडबडला कार्तिक आर्यन
तिनं पुढे लिहिलं, आपल्याला आता या ड्रामेबाज निर्मात्यांसाठी कडक नियम तयार करायला हवे आणि रामाला एक मिथक म्हणण्याचा हक्क कोणालाही देऊ नये. त्यांनी आपल्या महान संस्कृतीसाठी नैतिक नियम तयार केले होते आणि त्याचे योग्य पुरावे आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा हक्क कोणालाच नाही.
रंगोलीनं आणखी एक ट्वीट केलं, जो इतिहासाच्या नावावर सॉफ्ट पॉर्नची निर्मिती करत आहेत. त्यांना त्याची शिक्षा मिळायला हवी. आपल्या देशावर आक्रमण करणाऱ्या लोकांनी अनेक हत्या केल्या आहेत आणि असंख्य महिलांवर बलात्कार केले आहेत. त्यामुळे याच्यासाठी आम्हाला कोणताही संगीत समारोह नको आहे.
रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्ससोबत लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील? करिना म्हणते…
====================================================== VIDEO : अर्जुन कपूर, क्रिती सेन, संजय दत्त शेअर करणार स्क्रिन; ‘पानिपत’मधील कलाकारांचे लुक व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







