जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kangana Ranaut : 'ड्रग्ज घेणाऱ्याने रामाची भूमिका....' . कंगनाचा रणबीर कपूरवर जोरदार निशाणा

Kangana Ranaut : 'ड्रग्ज घेणाऱ्याने रामाची भूमिका....' . कंगनाचा रणबीर कपूरवर जोरदार निशाणा

कंगना रणौत

कंगना रणौत

कंगना रणौत आणि रणबीर कपूर या बॉलिवूड कलाकारांमध्ये छत्तीसचा आकडा आहे. फिल्मस्टार कंगना राणौत अभिनेत्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. यामध्ये तिने नाव न घेता रणबीर कपूरवर ताशेरे ओढले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जून : कंगना रणौत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती अनेकदा बॉलिवूडच्या सर्व स्टार्सवर निशाणा साधताना दिसते. आता पुन्हा तिने स्पशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. अलीकडेच कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून एक स्टोरी शेअर केली आहे. कंगना रणौत आणि रणबीर कपूर या बॉलिवूड कलाकारांमध्ये छत्तीसचा आकडा आहे. फिल्मस्टार कंगना राणौत अभिनेत्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. यामध्ये तिने नाव न घेता रणबीर कपूरवर ताशेरे ओढले आहेत. नुकतंच नितेश तिवारींच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट राम आणि सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. आता यावरूनच कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे. रणबीर कपूर रामाच्या तर KGF स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार  ही गोष्ट अभिनेत्रीला खटकली आहे. याचाच संदर्भ घेत तिने रणबीरवर निशाणा साधला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अलीकडेच बॉलिवूडमध्ये अजून एक रामायणावर चित्रपट येत असल्याची बातमी ऐकली. या चित्रपटात एक पांढरा उंदीर (तथाकथित अभिनेता) ज्याला थोड्या समजुतीची गरज आहे. जो पीआरच्या मदतीने बॉलीवूडमधील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीबद्दल वाईट गोष्टी पसरवतो. वुमेनाइजिंग आणि ड्रग्जच्या व्यसनाधीनतेसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता भगवान शंकराच्या ट्रायोलॉजीमध्ये (ज्याला कोणीही पाहिलं नाही किंवा याचे पुढील भाग पाहण्यासाठी इच्छुक नाहीत) स्वतःला सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर आता श्रीरामांची भूमिका साकारणार आहे.’ SRK Fans: मन्नत बाहेर शाहरुखच्या चाहत्यांनी केलं असं काही; थेट गिनिज वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये झाली नोंद ‘तर एक तरुण सुपरस्टार जो सेल्फ मेड समजला जातो. जो पारंपारिक प्रथा जपणाऱ्या कुटुंबातील आहे. वाल्मिकीजींच्या वर्णनानुसार, ज्याचा रंग, रूप आणि वैशिष्ट्ये रामाशी तंतोतंत जुळतात, तो रावणाची भूमिका करत आहे. हे कलियुग आहे. कोणत्याही नशा करणाऱ्या व्यक्तीने रामाची भूमिका करू नये. जय श्री राम.’ असं म्हणत कंगनाने रणबीर कपूर्वर टीका केली आहे. इतकंच नाही तर याच्या पुढे अभिनेत्रीने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे की, ‘तुम्ही मला एकदा टार्गेट केले तर मी मरेपर्यंत तुम्हाला  टार्गेट करेन. माझ्याशी पंगा घेऊ नका, माझ्यापासून दूर राहा.’ असं देखील म्हटलं आहे.  या पोस्टमध्ये अभिनेत्रीचे लक्ष्य रणबीर कपूरकडे आहे. नुकतीच बातमी समोर आली होती की, फिल्मस्टार रणबीर कपूर नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांच्या रामायणमध्ये मुख्य भूमिका साकारू शकतो.

News18

कंगना रणौतने अभिनेता रणबीर कपूरवर निशाणा साधण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही तिने अनेकवेळा अभिनेत्यावर हल्ला केला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने एकदा रणबीर कपूरच्या गैर-राजकीय टिप्पणीवर खरपूस समाचार घेतला आणि स्वतःला देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून संबोधले. याशिवाय ती रणबीर कपूरचे ड्रग्ज व्यसन, त्याचे अफेअर्स आणि आलिया भट्ट यांनाही टोमणे मारत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात