शाहरुख खानची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. या सुपरस्टारची झलक पाहण्यासाठी मुंबईतील बांद्रा येथील त्याच्या 'मन्नत' निवासस्थानाबाहेर हजारो चाहते दररोज गर्दी करतात.
नुकतंच मन्नत बाहेर शाहरुखच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. शाहरुखने देखील आपल्या चाहत्यांना घराच्या बाल्कनीतून अभिवादन केलं.
शाहरुखने चाहत्यांसाठी तीच आयकॉनिक पोज दिली, जी तो वर्षानुवर्षे करत आला आहे. पण यावेळी असे काही घडले की विश्वविक्रम झाला.
शाहरुखच्या चाहत्यांनी मिळून एक विश्वविक्रम केला आहे. शाहरुख खानचे जवळपास 300 चाहते मन्नतच्या बाहेर त्याच पोजमध्ये हात पसरून उभे होते. किंग खाननेही त्याच्यासोबत त्याच्या बाल्कनीत असेच केले.
जागतिक स्तरावर ओळख असलेल्या शाहरुख खानच्या चाहत्यांनी एकत्र ही पोझ देत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
शाहरुख खान त्याच्या चाहत्यांना उडवताना आणि हात पसरून त्याची आयकॉनिक पोझ देताना दिसला. एवढंच नाही तर त्याने त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' मधील 'झूमे जो पठाण' गाण्याची हुक स्टेप देखील केली.
यावेळी शाहरुखच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. चाहते त्याच्यासाठी जल्लोष करताना आणि प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.
किंग खाननेही हात जोडून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. शाहरुखच्या चाहत्यांनी केलेल्या या विक्रमाची सगळीकडेच चर्चा होत आहे.