'मुंबई PoK सारखी का वाटू लागली आहे?' संजय राऊत यांच्या टीकेनंतर कंगनाचा सवाल

'मुंबई PoK सारखी का वाटू लागली आहे?' संजय राऊत यांच्या टीकेनंतर कंगनाचा सवाल

अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 03 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) चर्चेत आली आहे. तिन ट्विटरवरून देखील विविध व्यक्तींवर टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. दरम्यान कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?'

शिवसेना नेता संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून असे म्हटले होते, त्या मुंबईत राहतात आणि तरीदेखील इथल्या पोलिसांवर टीका करतात. त्यांनी असे म्हटले होते की, 'मी त्यांना (कंगनाला) नम्र विनंती करतो की त्यांनी मुंबईत येऊ नये. हे मुंबई पोलिसांचा अपमान करण्याव्यतिरिक्त काही नाही आहे. गृह मंत्रालयाला यावर कारवाई करायला हवी'.

(हे वाचा-'तुम्ही खूप काही शिकवलं...' मराठीच्या शिक्षकांच्या निधनानंतर आमीरची भावुक पोस्ट)

कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस कमिशनर आणि मुंबई पोलिसांच्या कामकाजावर सवाल उपस्थित केले होते. तिने असा आरोप देखील केला होता की, CP मुंबई पोलिसांनी कंगनाबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्याचे ट्वीट लाइक केले आहे. कंगनाचे याबाबत मुंबई पोलिसांबरोबर ट्वीटवॉर झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.

(हे वाचा-'सुशांतच्या कुटुंबाने नव्हते म्हटले आत्महत्या आहे, पोलिसांनी जबरदस्ती घेतली सही')

दरम्यान गेले काही दिवस कंगना अनेक आक्रमक ट्वीट करत आहे. तिने काही कलाकारांच्या ड्रग टेस्टची मागणी केली होती. तर करण जोहर (Karan Johar) वर देखील तिखट शब्दात टीका केली आहे. कंगनाने करण जोहरला मूव्ही माफियांचा मुख्य गुन्हेगार म्हटले आहे. तिने पुढे म्हटलं आहे की, '@PMOIndia इतक्या सर्व जणांचे करिअर आणि आयुष्य संपवल्यानंतरही तो मुक्त आहे, आतापर्यंत त्याच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यात आली नाही आहे. आमच्यासाठी काही आशा आहे का?' असा सवाल तिने पंतप्रधानांना विचारला आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 3, 2020, 2:26 PM IST

ताज्या बातम्या