Home /News /entertainment /

'सुशांतच्या कुटुंबीयांनी नव्हते म्हटले आत्महत्या आहे, मुंबई पोलिसांनी जबरस्तीने घेतली स्टेटमेंटवर स्वाक्षरी'

'सुशांतच्या कुटुंबीयांनी नव्हते म्हटले आत्महत्या आहे, मुंबई पोलिसांनी जबरस्तीने घेतली स्टेटमेंटवर स्वाक्षरी'

सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी मुंबई पोलिसांवर एक धक्कादायक आरोप केला आहे.

    मुंबई, 03 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणी सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तिन्ही एजन्सी तपास करत आहेत. दिवसेंदिवस याप्रकरणी धक्कादायक खुलासे केले जात आहेत. सोशल मीडिया (Social Media) आणि न्यूज चॅनेल्स देखील सुशांतबाबत विविध खुलासे करत आहेत.  या दरम्यान सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी मुंबई पोलिसांवर धक्कादायक आरोप केला आहे. सुशांत प्रकरणी त्याच्या परिवारातील आणि इतर अनेक व्यक्तींनी, सेलिब्रिटींनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. काहींना समन देखील पाठवण्यात आले आहे. Times Nowच्या एका अहवालानुसार एका पत्रकार परिषदेमध्ये सुशांतच्या परिवाराच्या वकिलांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी त्यांना एक विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना विकास सिंह म्हणाले की, 'कुटुंबाने असे कधी स्टेटमेंट केले नव्हते की सुशांतने आत्महत्या केली आहे. हे स्टेटमेंट मुंबई पोलिसांनी मराठीमध्ये रेकॉर्ड केले होते. मराठीमध्ये लिहिण्याबाबत त्याच्या कुटुंबाने असे देखील म्हटले होते की तुम्ही आमची स्वाक्षरी घेणार आहात तर कृपया मराठीतून लिहू नका, त्याच्याकडून जबरदस्तीने मराठी स्टेटमेंटवर स्वाक्षरी घेण्यात आली. त्यांना माहित नव्हते त्यात काय लिहिले आहे.' (हे वाचा-अजय देवगणनंतर आता प्रभासशी दोन हात करणार सैफ, करीना म्हणाली- सर्वात हँडसम DEVIL) त्यांनी असे म्हटले आहे की, हे स्टेटमेंट सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांना वाचून नाही दाखवले गेले. त्यांनी असे म्हटले की, 'ते फक्त मराठीत लिहिण्यात आले. कुणाला वाचून देखील दाखवले नाही. जरी मराठीमध्ये वाचले असते तरी समोरच्याला मराठी येत नाही, त्यामुळे तेच सांगणार, जे समोरच्याला ऐकायचे आहे. ते  कसे तपासून पाहतील की काय लिहिले आहे. हे एक सिंपल लॉजिक आहे.' (हे वाचा-दिलीप कुमार यांच्या आणखी एका भावाचे कोरोनामुळे निधन, बुधवारी घेतला अखेरचा श्वास) सुशांतचा मृत्यू 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे याठिकाणी झाला होता. त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात सापडला होता. सुरुवातीला याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 35 हून अधिक जणांची चौकशी केली होती. सुशांतच्या कुटुंबीयांचा जबाब देखील त्यावेळी नोंदवण्यात आला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या