कंगना रनौत डॉक्टरांच्या निशाण्यावर, 'मेंटल है क्या'च्या अडचणीत वाढ

या सिनेमाच्या पोस्टरवरून अनेक डॉक्टर्सनी या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 10:36 AM IST

कंगना रनौत डॉक्टरांच्या निशाण्यावर, 'मेंटल है क्या'च्या अडचणीत वाढ

मुंबई, 2 मे : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सिनेमा 'मेंटल है क्या'च्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या सिनेमाच्या नावावरून डॉक्टर्सकडून सतत आक्षेप घेतला जात आहे. सुत्राच्या माहितीनुसार, 'इंडियन सायकायट्रिक सोसायटी'ने नुकतंच केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाला एक पत्र पाठवलं असून, या सिनेमाचं नाव मनोरुग्णांना चुकीच्या पद्धतीने समोर आणत असल्याचं त्या पत्रात म्हटलं आहे.
 

Loading...

View this post on Instagram
 

Get ready for craziness that cuts through! Mental Hai Kya releasing on 21st June 2019. #MentalHaiKya #MentalHaiKyaOn21stJune #KanganaRanaut @rajkummar_rao @ektaravikapoor @prakashkovelamudi @ruchikaakapoor @shaaileshrsingh @kanika.d #rajkummarrao @balajimotionpictures


A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

पाणी फाउंडेशनसाठी जेव्हा 'हे' मराठी स्टार्स वाहतात घाम

'इंडियन साइकायट्रिक सोसायटी'नं या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेतल्यानंतर दीपिका पदुकोणच्या 'लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन'नेही या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेतल्याचं बोललं जात आहे. दीपिकाचं हे फाउंडेशन मेंटल हेल्थशी संबंधित रोगांबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचं काम करतं. या सिनेमाची रिलीज डेटही ठरली असून त्यानंतर या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं पण या पोस्टरवरून अनेक डॉक्टर्सनी या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

'डिजेवाले बाबू'च्या या महागड्या गाडीची चर्चा, बोनेटवर चढून काढलेला फोटो झाला व्हायरल

नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असणाऱ्या कंगनाची डोकेदुखी या सिनेमामुळे वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाच्या बहिणीनं निर्माता महेश भट यांच्यावर 'वो लम्हे' सिनेमाच्या वेळी चप्पल फेकून मारल्याचा आरोप केला होता. त्यावर महेश भट यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'कंगना अजून लहान आहे. तिनं आमच्या प्रॉडक्शन हाउसमधून अभिनेत्री म्हणून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. आमचे संस्कार हे नाही शिकवत की आम्ही लहान मुलांवर टीका करावी त्यामुळे मी कंगनावर कोणतीही टीक करणार नाही.'

माझ्या नवऱ्याची बायको : गुरू 35 कोटी लंपास करतो पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 10:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...