महाराष्ट्र दिनानिमित्त आमीर खानच्या पाणी फाउंडेशनसाठी मराठी स्टार सई ताम्हणकरपासून सिद्धार्थ जाधवपर्यंत आणि स्पृहा जोशीपासून अमेय वाघपर्यंत साऱ्यांनीच श्रमदान केलं.
२०१६ मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली. ना नफा तत्वावर ही संस्था काम करते.
महाराष्ट्रातील पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करून राज्य दुष्काळमुक्त करण्याचं लक्ष या फाउंडेशनचं आहे.
२०१६ पासून अनेक गावं फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत आवर्जुन सहभाग घेत आहेत. यात कलाकारही ग्रामस्थांना मदत करण्यासाठी आणि श्रमदान करण्यासाठी आवर्जुन दुष्काळी भागाला भेट देतात
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मराठी सिनेसृष्टीतील अनेक स्टार महाराष्ट्रातील अनेक भागात श्रमदान करायला गेले.
सईसोबत येथे अभिनेता अमेय वाघही होता. अमेय आणि सईने मिळून फलटणजवळील कोरेगाव तालुक्यातील सोळशी गावातील महाश्रमदानात सहभाग घेतला.
सिन्नर तालूक्यातील धोंडीबार गावात पानी फाउंडेशनसाठी दिग्दर्शक रवी जाधव, पत्नी मेघना जाधव आणि अभिनेता भारत गणेशपुरे यांनी श्रमदान केलं.
सिन्नर तालूक्यातील धोंडीबार गावात पानी फाउंडेशनसाठी दिग्दर्शक रवी जाधव, पत्नी मेघना जाधव आणि अभिनेता भारत गणेशपुरे यांनी श्रमदान केलं.