माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत आनंद आणि जेनीच्या लग्नाची धामधूम जोरदार सुरू आहे. जेनीच्या लग्नात संगीत तर एकदम झकास झालं. सगळ्यांनीच आपला परफाॅर्मन्स सादर केला. गुरूही लग्नात आलाय. 35 कोटी रुपये पळवायचा प्लॅन गुरू आखतोय. राधिकानं शेतकरी फंडासाठी आणलेले 35 कोटी गुरू घेऊन पळून जातो. पण तो जसा बाहेर पडतो तसा त्याचा डाव सगळ्यांच्या लक्षात येतो. ते 35 कोटी घेऊन शनायासोबत संसार थाटायचा आणि राधिकाचं नुकसान करायचं या त्याच्या प्लॅनवर पाणी पडतं.