मुंबई, 30 मार्च: बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळख असलेल्या कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि करण जौहरचं (Karan Johar) वैर काही नवीन नाही. अनेक वेळा या दोघांमध्ये तु तु-मै मै झाल्याचं सोशल मीडियावर समोर आलं आहे. सोशल मीडियावरुन नेपोटीझम (Nepotism) आणि बॉलिवूडमधील गटबाजीवरून (Bollywood Groupism) तिने अनेकदा करण जौहरवर निशाणा साधला आहे. आता कंगनाने सिमी ग्रेवालच्या (Simi Grewal) शोची स्तुती करत, करणचं नाव न घेता खडे बोल सुनावले आहेत.
एका सोशल मीडिया युजरने सिमी ग्रेवाल यांना टॅग करत त्यांच्या कार्यक्रमाची स्तुती केली होती. 'मी सिमी ग्रेवाल यांचा कार्यक्रम बघत आहे. त्यांची मुलाखत घेण्याची पद्धत वेगळी होती आणि ती आतापर्यंत कुणालाही जमली नाही. आजकालच्या मुलाखतीत प्रामाणिकपणा दिसत नाही' असा मजकूर त्या युजरने ट्विटमध्ये लिहीला होता. या ट्विटवरुनच कंगनाला करणवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली. त्यानंतर तिने त्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.
'सिमी ग्रेवाल एका सेलिब्रेटीला वास्तविकपणे समोर आणतात. त्यामुळे जयललिता यांच्यासोबत त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचा मला चित्रपटावेळी फायदा झाला. त्यांचं व्यक्तिमत्व समजण्यास मदत झाली. मात्र ही बाब काही पप्पा बनून फिरण्याऱ्यांच्या शोमध्ये दिसत नाही. त्यांच्या शोमध्ये केवळ टीका, गॉसिप आणि फ्रस्टेटेड सेक्स यावर चर्चा होते.' असं उत्तर कंगनाने त्या युजरच्या ट्विटला दिलं आहे.
Yes @Simi_Garewaltapped tapped in to real essence of a celebrity, A complete sketch of the subject. Rendezvous with Jayaa maa has helped me a lot in my research, same can’t be said about certain Papa Jo whose interviews are all about bitching, bullying, gossip and frustrated sex https://t.co/ex0KySDI1E
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 30, 2021
कंगना एकदा करण जौहरच्या 'कॉफी विथ करण' (Coffee With Karan) या कार्यक्रमामध्ये पोहोचली होती. त्यावेळी तिनं करणवर नेपोटीझमचा आरोप लावला होता. त्यावेळी करणनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र हे दोघंही कायम एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना असो की, सोशल मीडियावर दोघं एकमेकांना सतत अपमानास्पद बोलताना दिसून आले. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने करणवर नेपोटीझमचा आरोप लावला होता.
(वाचा - 'माझ्या मुलीने मला मार खाताना पाहिलंय...', श्वेता तिवारीनं मोडलेल्या 2 लग्नांबाबत सोडलं मौन)
सिमी ग्रेवाल यांनी 1997 साली आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली होती. आतापर्यंत याचे पाच सिझन प्रसारीत झाले आहेत. यात त्यांनी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋषि कपूर, करीना कपूर, रतन टाटा यांच्यासह अनेकांचे इंटरव्ह्यू घेतले आहेत. तर करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो पहिल्यांदा 2004 मध्ये प्रसारीत झाला होता. आतापर्यंत या शोचे सहा सिझन प्रसारीत झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Kangana ranaut, Karan Johar, Simi garewal