मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'माझ्या मुलीने मला मार खाताना पाहिलंय...', श्वेता तिवारीनं मोडलेल्या 2 लग्नांबाबत सोडलं मौन

'माझ्या मुलीने मला मार खाताना पाहिलंय...', श्वेता तिवारीनं मोडलेल्या 2 लग्नांबाबत सोडलं मौन

टीव्ही विश्वाची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) पहिल्यांदाच आपल्या दोन तुटलेल्या विवाहांबद्दल (two mariages) मोकळेपणानं गप्पा साधल्या आहेत. दरम्यान तिने आपली दोन्ही लग्न तुटल्याची कारणं सांगितली आहेत.

टीव्ही विश्वाची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) पहिल्यांदाच आपल्या दोन तुटलेल्या विवाहांबद्दल (two mariages) मोकळेपणानं गप्पा साधल्या आहेत. दरम्यान तिने आपली दोन्ही लग्न तुटल्याची कारणं सांगितली आहेत.

टीव्ही विश्वाची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) पहिल्यांदाच आपल्या दोन तुटलेल्या विवाहांबद्दल (two mariages) मोकळेपणानं गप्पा साधल्या आहेत. दरम्यान तिने आपली दोन्ही लग्न तुटल्याची कारणं सांगितली आहेत.

मुंबई, 30 मार्च: टीव्ही विश्वाची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) पहिल्यांदाच आपल्या दोन तुटलेल्या लग्नांबद्दल मोकळेपणानं संवाद साधला आहे. श्वेताचं पहिलं लग्न राजा चौधरी यांच्याशी (Raja Chaudhari) झालं होतं. पहिल्या लग्नापासून श्वेताला एक मुलगीही झाली आहे. तिचं नाव पलक (Palak Tiwari) आहे. तर श्वेताने अभिनव कोहलीशी (Abhinav Kohli) दुसरं लग्न केलं होतं, दुसऱ्या लग्नापासून तिने एका मुलाला जन्म दिला होता. त्याचं नाव रेयांश आहे. रियांशचा जन्म 2016 मध्ये झाला होता. त्यानंतर श्वेतानं राजा आणि अभिनव दोघंही वाईट पती आहेत, असा आरोप श्वेताने केला आहे. तसेच तिने दोघांपासूनही घटस्फोट (Divorce) घेतला आहे. श्वेता तिवारीचं राजा चौधरीसोबत 1998 साली लग्न झालं होतं आणि 2012 मध्ये ते विभक्त झाले होते.

यानंतर, श्वेतानं 2013 साली अभिनव कोहलीशी लग्न केलं होतं. आता श्वेता अभिनवपासूनही विभक्त राहत आहे. दरम्यान अभिनवने सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेतावर बरेच आरोप केले आहेत. पत्नी श्वेता आपल्या मुलाला भेटू देत नाही, असा आरोपही अभिनवने केला आहे. श्वेताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आपल्या दोन तुटलेल्या विवाहांविषयी मौनही सोडलं आहे.

(हे वाचा-'मिसळीबरोबर पाव की ब्रेड' यावर माहिश्मतीला होणार युद्ध, पाहा काय 'कट' शिजतोय कट)

श्वेताच्या म्हणण्यानुसार, तिची मुलगी पलकने तिला मारहाण होताना पाहिलं आहे. तिचा पहिला नवरा राजा चौधरी तिला मारहाण करायचा. श्वेता पुढे म्हणाली की- 'माझी आई लग्नाबाबत नेहमी सांगत होती, की तू लग्नासाठी खूप लहान आहेस. त्यावेळी मला माझ्या जोडीदाराकडून भावनिक आधाराची गरज आहे. प्रेम विवाह करणारी मी माझ्या कुटुंबातील पहिली मुलगी होते. त्यातही मी आंतरजातीय विवाह केला होता. आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. पण मी 27 व्या वर्षांतच मी विभक्त झाले. माझ्या पतीच्या वागण्याचा माझ्या मुलीवर होणाऱ्या परिणामाची चिंता मला सतावत होती.

(हे वाचा- घरगुती हिंसेबाबत अभिनेत्री श्वेता तिवारीचा भावुक VIDEO, महिलांना केलं आवाहन)

तिने पुढं सांगितलं की, 'माझ्या मुलीने मला मारहाण होताना पाहिलं आहे. तिने परस्त्रियांना घरात येताना पाहिलं आहे. जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पलक 6 वर्षांची होती. तिने पोलिसांना घरात येताना पाहिलं आहे. तिने मला पोलीस स्थानकात जाताना पाहिलं आहे. माझ्या चार वर्षांच्या मुलालाही पोलीस आणि न्यायाधीशांबद्दलही माहिती आहे. हे मुळीच सुरक्षित नाही. मी या सर्व गोष्टीतून त्यांना अद्याप बाहेर काढू शकली नाही.'

First published:

Tags: Marriage, Relationship, Shweta tiwari, Tv actress, TV serials