

भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुकर ग्लॅमरपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या मैदानावर मात्र तिचाच दबदबा आहे.


बॉलिवूड किंवा लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहणारी सारा सौंदर्याच्या बाबतीत मात्र बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.


ग्लॅमरपासून दूर राहणाऱ्या सारा तेंडुलकरचा सोशल मीडियावर मात्र मोठा चाहता वर्ग आहे. इन्सटाग्रामवरही तिचे 6 लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.


सारा नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचा फॅशन सेन्स सुद्धा एखाद्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही.


मागच्या काही काळापासून बॉलिवूड पार्ट्यांमध्ये साराचा वाढता सहभाग पाहता ती अभिनय क्षेत्रात पदर्पण करणार अशा चर्चा होत्या मात्र यावर सचिन तेंडुलकर किंवा स्वतः सारानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


सारा सध्या लंडनमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. पण जेव्हाही ती भारतात येते त्यावेळी तिच्या लुकच्या चर्चा सोशल मीडियावर होतातच.