जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kangana Ranaut : जावेद अख्तरसोबत कायदेशीर लढाईत कंगनाला धक्का; कोर्टानं फेटाळले गीतकारावरील 'हे' आरोप

Kangana Ranaut : जावेद अख्तरसोबत कायदेशीर लढाईत कंगनाला धक्का; कोर्टानं फेटाळले गीतकारावरील 'हे' आरोप

कंगना राणौत

कंगना राणौत

जावेद अख्तरसोबतच्या कायदेशीर लढाईत कंगना राणौतला मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने जावेद अख्तर यांना समन्स बजावले असून त्यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे, तसेच त्यांच्यावरील ‘खंडणी’सह ४ आरोप फेटाळले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै :कंगना राणौतया ना त्या कारणाने कायमच चर्चेत असते. बहुतेकदा तिच्याबद्दल चर्चा होण्याचं कारण हे तिची बिनधास्त विधानं असतात. पण सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध  गीतकार जावेद अख्तर आणि कंगना राणौत यांच्यातील कायदेशीर लढाईला नवे वळण मिळाले आहे. जावेद अख्तरसोबतच्या कायदेशीर लढाईत कंगना राणौतला मोठा झटका बसला आहे.  न्यायालयाने जावेद अख्तर यांना समन्स बजावले असून त्यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे, तसेच त्यांच्यावरील ‘खंडणी’सह ४ आरोप फेटाळले आहेत. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घ्या. कंगना राणौतने जावेद अख्तरतांविरुद्ध दाखल केलेल्या तिच्या याचिकेत आरोप केला होता की, अख्तर यांनी मार्च 2016 मध्ये तिला आणि तिची बहीण रंगोली चंदेलला आपल्या घरी बोलावून हृतिक रोशनची माफी मागायला सांगितली होती. कंगनाने त्यावेळी  अभिनेता हृतिक रोशनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तेव्हाच तिने अभिनेत्यावर अनेक आरोप केले होते. त्यांच्या भांडणादरम्यानच अख्तर यांनी मध्यस्थी करून कंगनाला ह्रितिकची माफी मागायला लावली असा आरोप तिने केला होता. पण आता, मंगळवारी न्यायालयाने गीतकारावरील आरोप फेटाळून लावले असून, या प्रकरणात खंडणीचा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

News18लोकमत
News18लोकमत

कंगनाने तिच्या आरोपात म्हटले आहे की, जावेद अख्तर यांनी मार्च २०१६ मध्ये तिला आणि तिच्या बहिणीला जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी बोलावले आणि तिला घाबरवले, धमकावले. तसेच तिला तिच्या सहकलाकाराची म्हणजेच अभिनेता हृतिक रोशनची लेखी माफी मागण्यास सांगितले. त्यांनी असे केले जेणेकरून ते त्या अभिनेत्यासोबत माझ्याविरोधात कागदोपत्री पुरावा तयार करू शकतील. Pankhuri Awasthy-Gautam Rode : 14 वर्षांनी मोठा नवरा; लग्नाच्या 5 वर्षांनी आई झाली टेलिव्हिजनची द्रौपदी, थेट जुळ्या बाळांना दिला जन्म कंगनाच्या म्हणण्यानुसार, गीतकाराने तिला गुन्हेगारी पद्धतीने धमकावले. तसेच, तिला बळजबरीने त्याचा सहकलाकार म्हणजेच हृतिक रोशनची माफी मागण्यास सांगण्यात आले. कंगना राणौतने जावेद यांच्यावर तिच्याबद्दल खोटे आणि निराधार वक्तव्य करून आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे. कंगनाने दावा केला आहे की, गीतकाराने जाणूनबुजून तिचा  अपमान केला आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. एवढाच नाही तर हृतिक रोशन सोबतच्या तिच्या वैयक्तिक संबंधांवरही भाष्य केले. या वर्षाच्या सुरुवातीला कंगना राणौतने अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात आपले म्हणणे मांडले. यामध्ये तिने २०२१ मध्ये दिलेल्या मुलाखतीत आधी जे सांगितले होते त्याचा पुनरुच्चार केला. या मुलाखतीच्या आधारे जावेद अख्तर यांनी कंगना राणौतविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. कंगनाची बहीण रंगोलीनेही कोर्टात जावेद अख्तरच्या संभाषणाबाबत अभिनेत्याने केलेल्या दाव्याला पुष्टी देणारे निवेदन दिले. आता मात्र या प्रकरणात कंगनाला मोठा धक्का बसला असून पुढे नक्की काय घडतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात