टेलिव्हिजन अभिनेता गौतम रोडे आणि त्याची पत्नी पंखुडी अवस्थी नुकतेच आई-बाबा झालेत. दोघांच्या घरी एक नाही तर जुळ्या मुलांचं आगमन झालं आहे.
गौतम आणि पंखुडीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन जुळी मुलं झाली आहेत. 25 जुलै रोजी पंखुडीची डिलिव्हरी झाली.
गौतम रोडे याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली. दोघांना एक अॅनिमेटेड व्हिडीओ शेअर करत त्यांनी प्रेग्नंसीची बातमी दिली होती.
पखुंडी आणि गौतम यांची पहिली भेट सूर्यपुत्र कर्ण या मालिकेच्या सेटवर झाली होती. पखुंडीने मालिकेत द्रौपदीची भुमिका साकारली होती. तर गौतम कर्णाच्या भुमिकेत होता.
मालिके दरम्यान दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि आता दोघे दोन मुलांचे आई-बाबा झालेत.
गौतम हा पखुंडीपेक्षा तब्बल 14 वर्षांनी मोठा आहे. दोघांनी 2018मध्ये राजस्थानमध्ये लग्न केलं. लग्नाच्या 5 वर्षांनी त्यांनी आई-वडील होण्याचा निर्णय घेतला.
प्रेग्नंसी आधी पखुंडीला PCODचा सामना करावा लागला होता. त्यामुळे प्रेग्नंसीमध्ये अनेक अडथळे आले. पण त्यावर मात करत पखुंडीने दोन मुलांना जन्म दिलाय.
पखुंडीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर तिनं 'सूर्यपुत्र कर्ण', 'कौन है?', 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'मैडम सर', 'अमला' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
तर गौतमने आतापर्यंत 'मेरा नाम करेगी रोशन', 'सरस्वतीचंद्र', 'महाकुंभ: एक रहस्य', 'एक कहानी', 'सूर्यपुत्र कर्ण', 'काल भैरव रहस्य 2' सारख्या मालिकेत काम केलं आहे.