मुंबई, 05 फेब्रुवारी: कंगना रणौत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती अनेकदा बॉलिवूडच्या सर्व स्टार्सवर निशाणा साधताना दिसते. आता पुन्हा तिने स्पशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडप्यावर निशाणा साधला आहे. अलीकडेच कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने नाव न घेता आलिया आणि रणबीर वर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने तिच्यावर कोणाकडून तरी पाळत ठेवली जातेय असा खुलासा करत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यावर संशय घेतला आहे. काय म्हणाली आहे ती नक्की पाहा.
कंगनाने लिहिलंय कि, "मी जिथे जाते तिथे माझा पाठलाग केला जातो. फक्त रस्त्यावरच नाही, माझ्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आणि माझ्या घराच्या छतावरही ते माझी हेरगिरी करण्यासाठी झूम लेन्स लावतात. सगळ्यांना माहित आहे की पापाराझी फक्त स्टार्सकडे जातात. त्यांना त्याचे पैसे कधी मिळतात. जर मी किंवा माझी टीम त्यांना पैसे देत नसेल तर कोण आहे? मला सकाळी 6:30 वाजता क्लिक केले होते, त्यांना माझे वेळापत्रक कसे कळले, ते या फोटोंचे काय करतात? मी कुठे जातेय हे कोणालाही कळवत नाही, तरीही ते सर्व रविवारी मोठ्या संख्येने येतात."
हेही वाचा - Sidharth- Kiara Wedding: सुनबाईंबद्दल विचारताच सिद्धार्थच्या आईने दिली 'ही' रिऍक्शन; 'तो' व्हिडीओ व्हायरल
यामागे फिल्म इंडस्ट्रीचा 'कॅसनोव्हा' असू शकतो, असे कंगना म्हणते. ती म्हणते, "मला खात्री आहे की माझ्या व्हॉट्सअॅप डेटामधून व्यावसायिक सौदे आणि वैयक्तिक माहिती लीक केली जात आहे. तो नेपो माफिया जोकर, जो एकदा विनानिमंत्रित माझ्या दारात आला होता आणि माझ्यावर जबरदस्ती केली होती, आणि त्याच्या ओळखीचा तो एक जो स्त्रीवादी मानला जातो. ज्याने आपल्या पत्नीला निर्माती बनण्यास आणि अधिक महिला-केंद्रित चित्रपट करण्यास भाग पाडले. जो माझ्यासारखे कपडे घालतो, माझ्या घरासारखे इंटिरिअर बनवतो त्याने माझे हेअरस्टायलिस्ट आणि होम स्टायलिस्ट देखील नियुक्त केले , ज्याने नंतर माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला.
इतकंच नाही तर ती पुढे म्हणते, "त्याची पत्नी या वागण्याला प्रोत्साहन देत आहे, तिने तिच्या लग्नात तीच साडी घातली होती, जी मी आधी माझ्या भावाच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी घातली होती, हे खूप विचित्र आहे. अलीकडेच एक फिल्म कॉस्च्युम डिझायनर मित्र ज्याला मी दहा वर्षांहून अधिक काळ ओळखते आता तो त्या जोडप्यासोबत काम करत आहे. माझे फायनान्सर्स आणि व्यावसायिक भागीदार शेवटच्या क्षणी कोणतेही कारण नसताना नकार देतात. मला वाटते की ते मला मानसिक तणावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.'
यापुढे कंगनाने या जोडप्याच्या खाजगी आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली, 'तो तिला दुसऱ्या मजल्यावर ठेवतो. ते दोघे एकाच इमारतीत स्वतंत्रपणे राहतात. तिने या व्यवस्थेला नाही म्हणायला हवे आणि त्याच्यावर लक्ष ठेवावे... त्याला हा सगळा डेटा कसा मिळतो आणि तो काय करतो आहे, कारण तो अडचणीत आला तर तो आणि त्याचे मूल सुद्धा संकटात असेल..त्याने आपल्या जीवनाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि तो काही बेकायदेशीर करत नाही याची काळजी घ्यावी... तुमच्या नवजात बाळाला खूप प्रेम.'
आलिया भट्टने तिच्या लग्नात जी साडी नेसली होती तशीच साडी कंगनाने त्यापूर्वी तिच्या बहिणीच्या लग्नात नेसली होती. त्यामुळे तिने आलिया आणि रणबीर निशाणा साधला आहे हे स्पष्ट होतं. कंगनाने केलेल्या या डाव्यांनी सगळीकडे खळबळ माजली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Kangana ranaut, Ranbir kapoor