मुंबई, 8 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता केआरके अर्थातच कमाल राशिद खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. कमाल आर खान हा सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय असतो. बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांविरोधोत सिनेमांविरोधात तो कायम वादग्रस्त ट्विट करत असतो. सिनेमांचे रिव्ह्यू देत असतो. त्याची विधानं नेहमीच वादात आली आहेत. अनेकदा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील आला आहे. मध्यंतरी त्याला याचसाठी अटक झाली होती आणि त्यानंतर 14 दिवसांची पोलीस कस्टडी देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर देखील त्याने चित्रपट आणि कलाकारांवर टीका करणं काही सोडलेलं नाही. पुन्हा एकदा त्याने ट्विटरवरून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कमाल आर खानने 6 ऑक्टोबरला एक ट्विट केले होते. ज्यामध्ये लिहिले होते, ‘बरेच लोक मला चित्रपटाचे रिव्ह्यू करणं सुरू ठेवण्याची विनंती करत आहेत. मग मी चित्रपटांचे समीक्षण करणं सुरू ठेवू का? मला हो आणि नाही सांगा.’ यानंतर त्याला या पोस्टवर 2 मिलियन लोकांनी रिप्लाय दिला. आज त्याने सकाळी सर्व्हे पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘20लाख लोकांनी मला चित्रपटांचे समीक्षण सुरू ठेवण्यास सांगितले आहे. जर मी ते बंद केले तर मी जगभरातील लाखो चित्रपटप्रेमींना दुखावत आहे.’ हेही वाचा - Akshay kumar- Ritesh Deshmukh: अक्षय-रितेशची जोडी पुन्हा झळकणार एकत्र; ‘या’ चित्रपटात घालणार धुमाकूळ या पोस्टनंतर लगेचच त्याने रणबीर कपूर-आलिया भट्ट स्टारर चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर टीका केली आहे. ट्विटमध्ये त्याने लिहिले कि, “ब्रह्मास्त्र” ने भारतात 175 कोटींचे आयुष्यभराचे कलेक्शन केले आहे. म्हणजेच निर्मात्यांना सुमारे 400 कोटींचे नुकसान झाले आहे, त्यामुळे बॉलीवूडच्या इतिहासातील सर्वात फ्लॉप चित्रपट आहे. करण जोहर असे रेकॉर्ड बनवण्यासाठी तुझे अभिनंदन’.
Saif Ali khan said in his interview!
— KRK (@kamaalrkhan) October 8, 2022
I m really surprised to see some reviews (Means He was talking about me) of #VikramVedha! Now these outsiders will teach us Bollywood people, how to make good films?
Means this Nawab considers Bollywood his Jaagir and outsiders Keeda Makaudaa.
यासोबतच त्याने सैफ अली खानवर देखील निशाणा साधला आहे. केआरकेने या ट्विटमध्ये लिहिले कि, ‘“सैफ अली खान एका मुलाखतीत म्हणाला की त्याने ‘विक्रम वेधा’चे काही रिव्यू वाचले आणि तो म्हणाला की बाहेरून आलेली ही मंडळी आम्हाला चांगला चित्रपट बनवायचा कसा ही शिकवणार का? या नवाबला वाटतं बॉलिवूड ही त्याची जहागीर आहे, याचा अर्थ हा बॉलिवूडचा नवाब बाहेरून येणाऱ्या कलाकारांना कवडीचीही किंमत देत नाही.’’
सैफ आणि हृतिकचा ‘विक्रम वेधा’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाकडून बॉलिवूडला अपेक्षा होत्या. याचबाबत सैफ अली खानने चित्रपटाचं समीक्षण करणाऱ्या लोकांवर टीका केली होती. कमल खान हा आजपासून रिव्ह्यू देण्याचे बोलत असला तरी त्याच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर तो तुरुंगातून बाहेर आल्यापासून सतत पोस्ट करत आहे. ‘आदिपुरुष’च्या टीझरवरही त्याने टीका केली होती. त्यानं लिहिले होते की, ‘भूषण कुमारने 450 कोटी खर्च करण्याची चूक केल्याचा हा टीझर पुरावा आहे. रामायण 3 तासात दाखवता येत नाही.’

)







