जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Akshay kumar- Ritesh Deshmukh: अक्षय-रितेशची जोडी पुन्हा झळकणार एकत्र; 'या' चित्रपटात घालणार धुमाकूळ

Akshay kumar- Ritesh Deshmukh: अक्षय-रितेशची जोडी पुन्हा झळकणार एकत्र; 'या' चित्रपटात घालणार धुमाकूळ

अक्षय कुमार-रितेश देशमुख

अक्षय कुमार-रितेश देशमुख

अक्षय कुमार आणि रितेश देशमुखच्या या जोडीने हाऊसफुल या विनोदी चित्रपटातून एकत्र येत अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा ते एकत्र येण्यासाठी सज्ज झालेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 8 ऑक्टोबर : 2010 साली प्रदर्शित झालेला  ‘हाऊसफुल’ हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अक्षय कुमार आणि रितेश देशमुखच्या या जोडीने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आलेले या चित्रपटाचे सिक्वेलही प्रेक्षकांच्या तितकेच पसंतीस उतरले. ‘हाऊसफुल’ चित्रपटाप्रमाणेच इतर तीनही सिक्वेल सुद्धा  हीट ठरले होते. आता हाऊसफूलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच हाऊसफुल सिरीजचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी अशी घोषणा केली आहे. सिरीजचा पुढचा भाग म्हणजे  ‘हाऊसफुल 5’  साठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. साजिद नाडियावालाने ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या सीरिजची निर्मिती केली आहे. आता ते ‘हाऊसफुल 5’ चित्रपटासाठी तयारी करत असल्याची माहिती ‘पिंकविला’ने दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘हाऊसफुल’ सीरिजमधील सगळे कलाकार ‘हाऊसफुल 5’ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच साजिद नाडियावाला या सीरिजच्या पुढच्या भागाचा विचार करत आहेत. ‘हाऊसफुल’ सीरिजमधील सगळ्या पात्रांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न ‘हाऊसफुल ५’ मध्ये करण्यात येत आहे. कथा आणि पटकथा यावर अजूनही काम सुरू आहे. ‘हाऊसफुल 5’ हा या सीरिजमधील सगळ्यात  मोठा चित्रपट असणार आहे. हेही वाचा - Shahrukh khan: सिनेमा फ्लॉप होताच शाहरूख सोडणार इंडस्ट्री? करणार ‘हे’ काम; अभिनेत्याचं ‘ते’ ट्विट चर्चेत ‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या सीरिजचे निर्माते साजिद नाडियावाला स्वत: ‘हाऊसफुल ५’साठी लिहिण्यात येत असलेल्या स्क्रिप्टमध्ये लक्ष घालत आहेत. या चित्रपटात आतापर्यंत हाऊसफूलच्या सिरीजमध्ये असलेले सगळे कलाकार एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसह, रितेश देशमुख, बॉबी देओल, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच ‘हाऊसफुल’ सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या अभिनेत्रींही झळकणार असल्याची माहिती आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याविषयी अजून अधिकृत माहिती नसली तरी हा चित्रपट पुन्हा  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे नक्की. 2010 साली ‘हाऊसफुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2012 आणि 2016 साली या चित्रपटाच्या सीरिजमधील दुसरा आणि तिसरा भाग प्रदर्शित करण्यात आला होता. ‘2019’ मध्ये ‘हाऊसफुल 4’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा पुढच्या भागाचा विचार निर्माते करत होते. आता लवकरच ‘हाऊसफुल 5’ ची मजा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात