मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अजून कोरोना संपलेला नाही!' पॉझिटिव्ह आल्यानंतर या अभिनेत्यानं केलं Tweet

अजून कोरोना संपलेला नाही!' पॉझिटिव्ह आल्यानंतर या अभिनेत्यानं केलं Tweet

अद्याप कोरोना संपलेला नाही कारण आजही कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. कलाकार मंडळी सारखे दौऱ्यावर असता. अशाच एक अभिनेत्यास परदेशातून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे.

अद्याप कोरोना संपलेला नाही कारण आजही कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. कलाकार मंडळी सारखे दौऱ्यावर असता. अशाच एक अभिनेत्यास परदेशातून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे.

अद्याप कोरोना संपलेला नाही कारण आजही कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. कलाकार मंडळी सारखे दौऱ्यावर असता. अशाच एक अभिनेत्यास परदेशातून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई, 22 नोव्हेंबर:  अद्याप कोरोना संपलेला नाही कारण आजही कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. कलाकार मंडळी सारखे दौऱ्यावर असता. अशाच एक अभिनेत्यास परदेशातून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे.अभिनेते कमल हसन ( Kamal Haasan) यांना कोरोनाची (covid 19) लागण झाली आहे. युएस दौऱ्यावरून परतलेल्या कमल हसन यांना हलकासा खोकला झाला होता. यानंतर त्याची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये तो कोविड पॉझिटिव्ह आलेत. स्वत: कमल हसन यांनीही याबाबत माहिती दिली आहे व मी आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगितले आहे.

"युएस दौऱ्यावरुन परत आल्यावर मला थोडासा खोकला झाला होता. त्यामुळे मी तपासणी केली आणि मला कोरोना झाल्याचं समोर आलं. मी आयसोलेशनमध्ये आहे. पण, अजूनही कोरोना महामारी संपली नाही हे माझ्या लक्षात आलंय. तुम्ही सगळे सुरक्षित राहा आणि काळजी घ्या", असं ट्विट कमल हासन यांनी केलं आहे.

वाचा : जेनेलिया डिसूजाच्या 'परी' लुकने जिंकले चाहत्यांचे मन; PHOTO पाहून थक्क व्हाल

कमल हासनच्या ट्विटनंतर चाहते ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. कमल हासन आजारी असताना बिग बॉसचे सूत्रसंचालन कोण करणार हे काहींना जाणून घ्यायचे आहे. कमल हासन हे दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. बॉलीवूडसोबतच साऊथ सिनेसृष्टीतही त्यांनी मोठी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय भारताच्या राजकारणातही त्यांचे मोठं नाव आहे.

1960 पासून करिअरची सुरुवात करणाऱ्या कमल हसन यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात तमिळ चित्रपट Varumayin Niram Sivappu, 1985 मधील सागर चित्रपट, Vishwaroopam, चाची 420, अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. कमल यांना त्यांच्या सिनेमातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यासोबतच त्यांनी फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले आहेत.

वाचा : रकुलप्रीत -जॅकी भगनानीशी कधी करणार लग्न? अभिनेत्रीने सांगितला संपूर्ण प्लॅन

आतापर्यंत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. वेळेत उपचार घेतल्यामुळे बरे देखील झाले आहेत. कमल हासन देखील यांना कोरोना झाल्याचे समजताच चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थन करण्यास सुरूवात केली आहे.

First published:

Tags: Bollywood News, Corona, Entertainment, Kamal hassan, Tollywood