जेनेलिया डिसूझा ही बॉलिवूडमधील सर्वात क्यूट अभिनेत्रींपैकी एक आहे. जरी ती चित्रपटांमध्ये फार सक्रिय नसली तरी आजही तिची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. इन्स्टाग्रामवर तिला 8 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात.
जेनेलिया डिसूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. जेनेलियाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये जेनेलिया डिसूजा परी दिसत आहे. चाहतेही तिच्या या फोटोंचे कौतुक करताना दिसत आहेत. (फोटो साभार: geneliad/instagram)
जेनेलिया डिसूझाने तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुख होता. पहिल्याच चित्रपटापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते.
जेनेलियाने यानंतर अनेक चांगले चित्रपट केले पण लग्न आणि मुलांना जन्म दिल्यानंतर तिने ब्रेक घेतला. पण आता ती लवकरच परतेल अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे.