• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रकुलप्रीत -जॅकी भगनानीशी कधी करणार लग्न? अभिनेत्रीने सांगितला संपूर्ण प्लॅन

रकुलप्रीत -जॅकी भगनानीशी कधी करणार लग्न? अभिनेत्रीने सांगितला संपूर्ण प्लॅन

. काही दिवसापूर्वी रकुलप्रीत सिंगने (Rakul Preet Singh) आपण अभिनेता आणि प्रोड्युसर जॅकी भगनानीसोबत(Jacky Bhagnani) रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 नोव्हेंबर: बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई जोरात आहे. नुकतच पत्रलेखा आणि राजकुमार राव यांनी लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसापूर्वी रकुलप्रीत सिंगने (Rakul Preet Singh) आपण अभिनेता आणि प्रोड्युसर जॅकी भगनानीसोबत(Jacky Bhagnani) रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्का होता. आता ही जोडी लवकरच लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे. दरम्यान, रकुलप्रीत सिंगनेही यावर उत्तर दिले आहे. करिअर आणि रिलेशनशिपवर बोलली रकुलप्रीत रकुलप्रीत सिंहने 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअर आणि लग्नाविषयी मत मांडलं. ती म्हणाली, “मला ज्या गोष्टी ऐकायला आवडतात ज्या मला ऐकायच्या असतात. मी गोष्टींचा प्रभाव न पडणे निवडतो. मी वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले कारण मला वाटले की ते छान आहे आणि मला ते सगळ्यांसोबत शेअर करायचे होते. वाचा : जेनेलिया डिसूजाच्या 'परी' लुकने जिंकले चाहत्यांचे मन; PHOTO पाहून थक्क व्हाल गॉसिपचा कसलाच परिणाम होत नाही सेलिब्रेटीच्या आयुष्यावर नेहमीच सगळ्यांची नजर असते. पब्लिक फिगर असण्याचा हा तोटा आहे, असे ती म्हणाले. माझ्यावर गॉसिपचा कसलाच परिणाम होत नाही. मी माझे काम कॅमेरासमोर करतो आणि ऑफ कॅमेरा ही माझी वैयक्तिक स्पेस आहे. तिच्या लग्नाबाबत 'हिंदुस्तान टाइम्स'शी झालेल्या मुलाखतीवेळी तिने तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दलही सांगितले आणि सध्या ती काय विचार करत आहे हेही सांगितले. वाचा : फायनली ओम- स्वीटूची प्रेमकहाणी होणार पूर्ण ; आणि मग सिरीयल बंद...? लग्नाबद्दल म्हणाली... आपल्या लग्नाबद्दल ती म्हणाली, 'जेव्हा व्हायचे आहे, ते होईल. इतर सर्व गोष्टींप्रमाणे मी ते सर्वांसोबत शेअर करेन. सध्या मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे कारण त्यासाठीच मी इथे आलो आहे. सध्या फक्त यावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल. कामबद्दल सांगायचे तर रकुलप्रीत सिंग 'अटॅक', 'मई डे', 'थँक गॉड', 'डॉक्टर जी' आणि 'मिशन सिंड्रेला' करत आहे. यातील काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले असून काही सध्या सुरू आहेत. पण, राकुलप्रीत सिंग येत्या काळात एकामागून एक अनेक चित्रपटांतून धमाका करणार आहे हे मात्र नक्की.
  Published by:News18 Trending Desk
  First published: