जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kamal Haasan: 'द केरळ स्टोरी' बाबत कमल हासन यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले 'हा चित्रपट खरा नाही...'

Kamal Haasan: 'द केरळ स्टोरी' बाबत कमल हासन यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले 'हा चित्रपट खरा नाही...'

 कमल हसनने 'द केरळ स्टोरी'बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कमल हसनने 'द केरळ स्टोरी'बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविषयी अभिनेता आणि राजकारणी कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या चित्रपटाबद्दल अतिशय वादग्रस्त विधान केले आहे. एका अवॉर्ड शो दरम्यान त्यांनी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 मे :सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने 22 दिवसांत 194 कोटींची कमाई केली आहे. सुरुवातीला ठिकठिकाणी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती. बंगाल आणि तामिळनाडूमध्येही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. लोकांनी याला प्रपोगंडा असल्याचं सांगून विरोध करण्यास सुरुवात केली होती. पण कोणत्याही विरोधाला न जुमानता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. अनेक जणांनी या चित्रपटाचं कौतुक केलं.  आता अभिनेता आणि राजकारणी कमल हसन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या चित्रपटाबद्दल अतिशय वादग्रस्त विधान केले आहे. एका अवॉर्ड शो दरम्यान त्यांनी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. कमल हसनने ‘द केरळ स्टोरी’बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कमल हासन या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ‘मी तुम्हाला सांगितले होते हा प्रोपगंडा चित्रपट आहे आणि मी प्रोपगंडा चित्रपटांच्या विरोधात आहे. चित्रपटाच्या लोगोवर किंवा पोस्टरच्या खाली सत्यघटनेवर आधारित असे लिहून उपयोग नाही. आपण जे दाखवतो ते खरोखरच खरे असले पाहिजे आणि हा चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ खरा नाही.’ कमल हसनच्या या वक्तव्यानंतर एकच गदारोळ उठला आहे. काही जण त्यांच्या या वक्तव्याला पाठींबा देत आहेत तर काही जण त्यांना ट्रोल करत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

कमल हासन यांच्या या वक्त्यव्यावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी त्यांना ‘तुम्ही आजपर्यंत कोणत्या सत्य घटनेवर चित्रपट बनवला आहे.’ असा प्रश्न विचारला आहे .कमल हासन हे त्यांचे विचार खुलेपणाने शेअर करण्यासाठी ओळखले जातात. अभिनेता असण्यासोबतच ते राजकारणातही सतत सक्रिय असतात. गेल्या वर्षी ते विक्रम या चित्रपटात दिसले होते. लोकेश कनगराज दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. Adah Sharma: बॉलिवूडमध्ये होणाऱ्या भेदभावाविषयी स्पष्टच बोलली अदा शर्मा; म्हणाली ‘अशा वातावरणात काम करताना…’ दुसरीकडे, द केरळ स्टोरीबद्दल सांगायचे तर, अदा शर्माने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. यामध्ये त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. अदा शर्माच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन आठवडे पूर्ण केले आहेत. तीन आठवड्यांत, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 194.57 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. चौथ्या वीकेंडमध्ये हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सहज प्रवेश करेल. 15-20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. \ ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर, हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा निर्मात्यांनी केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात